________________
(५१८)
S
HARE
सदगुरु आणि २
आणि शास्त्रश्रवण पण प्राप्त झाले तरी बोधी प्राप्त होणे अत्यंत दुर्लभ आहे.४३९
जैन शाखात एक वस्तुला अतिशय दुर्लभ मानले आहे. धन, वैभव, स्वर्ग पदसापाप्त होणे इतके दुर्लभ नाही. सम्यक्त्व बोधी सम्यक्त्वात खरी निष्ठा, ती प्राप्त याशिवाय जीवन व्यर्थ आहे. प्रचूर पूर्व ज्ञानाचा धनी असला पण त्याला सत्यावर आधारीत आस्था, श्रद्धा नसेल तर त्याचे ते ज्ञान, कल्याणकारी नाही. 'रुचिर्जिनोत्कतत्वे गायक श्रद्धानमुच्यते' अर्थात तीर्थंकर अथवा अरिहंत द्वारा सांगितलेल्या तत्त्वावर आणि मनावर रुची विश्वास व श्रद्धा ठेवणे ह्यालाच सम्यक्श्रद्धा म्हणतात. श्रद्धा अथवा सम्यक्त्व नसले तर जसे एका गाढवावर चंदनाच्या लाकडाचा भारा लादला तर तो फक्त ते ओझे बाहतो, चंदनाच्या सुगंधाचा त्याला पत्ताच नसतो. तसेच सम्यग्वोधी शिवाय घोरातिघोर तपाचरण केले तरी ते अज्ञान तपातच गणले जाते.
आचार्य हेमचंद्रांनी बोधीदुर्लभ भावनेचे चार श्लोक लिहिले आहेत त्यात फार सुंदर वर्णन केले आहे. एका पर्वतीय नदीच्या प्रवाहात वाहत येणारा पाषाण टक्करा खात खात आपल्या विशेष प्रयत्नाशिवाय गोल आकार घेतो. त्याचप्रमाणे संसाराच्या प्रवाहात जन्ममरण करीतकरीत हा जीव कधी कधी विशिष्ट अकाम निर्जरामुळे अर्थात अजाणतेपणी झालेल्या कर्माच्या निर्जरामुळे कर्माच्या ओझ्यातून थोडे हलकेपणा अनुभव करतो. परिणामत: तो जीव स्थावर पर्यायातून सपर्याय, पंचेन्द्रिय, तिर्यंच इ. उत्तरोत्तर वाढत जातो. कर्माच्या हळुवारपणामुळे मानव जीवन आर्यदेशात जन्म उत्तम जाती. परिपर्ण इंदिया आणि दीर्घायुष्य प्राप्त करतो. या संयोगामुळे, पुण्योदयामुळे त्याच्या मनात धर्माची अभिलाषा जागृत होते. धर्मश्रवणाचा सुअवसर प्राप्त होतो. तरी ही सत्तत्व निश्चय रूप बोधिरत्न मिळणे अती कठीण आहे.४४० मला ते प्राप्त होओ आणि माझे जीवन ज्योर्तिमय बनो. हा दुर्लभ मानव भव सार्थक होवो अशा प्रकारे व्यक्ती जसजसा या भावनेने भावित होत जातो आणि पुन्हा पुन्हा ह्या भावनेचे चिंतन करीत जातो तसतशी त्याच्या मनात एक अन्तः स्फूर्ती उत्पन्न होते. त्याच्यात विशेष पुरुषार्थ जागतो. धर्माच्या मार्गावर आरूढ
होण्यास आलंबन मिळते.
भगवती आराधनेत पण बोधिदर्लभ भावनेचे वर्णन आहे. ते सामान्यतः सर्व काप्रमाणे ही भावना फार महत्त्वपूर्ण आहे. कारण आत्मकल्याणाच्या मार्गाची पहिली । ही सम्यक्बोधीच आहे. सम्यकबोधीच्या शिवाय बाकी सर्व व्यर्थ आहे. कोणी
झाला पण त्याला सम्यगबोधी प्राप्त नसेल तर तो अज्ञानीच आहे.
कितीही ज्ञानी झाला पण त्याला सम्यग्