________________
निगोद जीवाची अविकसित अशी अंतिम अवस्था आहे. सर्वाधिक निम्न कोटीची ती आहे. एका बोटाच्या असंख्यात भाग इतके क्षेत्र जिथे अनंत जीव राहण्याचे स्थान आहे. त्यालाच निगोद म्हणतात.
नित्यनिगोदात असलेले जीव अनंत काळापर्यंत तेथेच वास्तव्य करून असतात. चतर्गति निगोद तेथून निघून पृथ्वीकायादीमध्ये जन्म घेतात. परंतु ते अज्ञान अवस्थेतच राहतात. त्यांचा विकास होतच नाही. पुढे ते असंख्यात काळापर्यंत बादर-सूक्ष्म, अलकायामध्ये भटकत असतात. परंतु चिंतामणी रत्नत्रय पर्याय अत्यंत मुश्कीलीने प्राप्त करतात.
_पुढे एकेन्द्रिय मधून द्विइंद्रिय दुर्लभ आहे. अगदी पंचेन्द्रिय प्राप्त केल्या तरी सन्नी (मनसहित) होणे फारच कठीण आहे समजा समनस्क झाला तरी रौद्रस्वरूपी तिर्यंच प्राणी बनतो. सदैव पापरूपी परिणामातच रममाण राहतो. परिणामस्वरूप ता नरकगामी होतो. तीव्र अशुभ लेश्यामुळे प्राणांचा त्याग करून अत्यंत दु:खप्रद नरकात जातो. जिथे अत्यधिक शारीरिक तथा मानसिक कष्ट भोगतो.
नरकातून निघून परत तिर्यंच गतीमध्ये जातो. अशाप्रकारे भटकत भटकत तिर्यंच पर्यायातून निघून अत्यंत दुर्लभ अशा मनुष्य जन्माला प्राप्त करतो. परंतु मिथ्यादृष्टी म्लेच्छ अशा कुळात जाऊन पापांचे अर्जन करीत राहतो. अशा क्रमाक्रमाने जाताना कदाचित आर्यखण्डात जन्म घेतो. पण संस्कारशील कुळ मिळणे अत्यंत दुर्लभ असते. तसा उत्तम कुळ मिळाला समजा तरी निर्धन दरिद्री कुटुंबात जन्म मिळतो. आणि संयोगवशात् धनसंपन्नता पूर्ण कुंटुब मिळाले तरी इंद्रिया परिपूर्ण अवस्थेत स्वरूप शरीराची प्राप्ती अत्यंत दुर्लभ आहे. दीर्घायु मिळाली तरी उत्तम शील उत्तम स्वभाव मिळणे दुर्लभ आहे. ते ही सब मिळाले तर सम्यक् दर्शनादी रत्नत्रयाच्या आराधकाचे सान्निध्य मिळणे अतिशय दुलभ आहे. तसे सान्निध्यही मिळाले पण तत्त्व श्रद्धा सहतत्वांबद्दल आस्थायुक्त सम्यक्त्व नळण तर महा कठीण आहे. संयोगवश सम्यकदृष्टी ही मिळाली तर चारित्र्य व्रतांचा स्वीकार करणे संभव नाही. व्रत ही स्वीकारले तरी व्रत पालन करण्यात सक्षम नाही. रत्नत्रय नान करूनही जर जीव अनन्तानुबंधी क्रोधादी तीव्र कषाय युक्त असेल तर त्या जीवाचा लत्रय नष्ट होऊन तो तिर्यच गतित जातो. किंवा मनुष्य गतीत ही जाऊ शकतो. वनवासी, व्यंतर, ज्योतिषादी देवयोनीत उत्पन्न होऊ शकतो.४३६
समुद्रात अमूल्य तीन रत्न पडले तर त्यांना शोधणे अत्यंत कठीण आहे.