________________
(५२६)
बोधी प्राप्त होणे अती दुर्लभ आहे, जीवाला मनुष्यपर्याय प्राप्त झाल्यानंतर पण अभ्यास नसल्यामुळे बोधी प्राप्त होणे दुर्लभच आहे. तरीपण जो निश्चयच करतो त्याच्यासाठी काहीच दुर्लभ नाही. पुरुषार्थ करणाऱ्यासाठी काय सुलभ आणि काय दुर्लभ ? सर्व काही सुलभच आहे.
बोधीदुर्लभ भावनेचे वास्तविक स्वरूप हेच आहे की जोपर्यंत आपण जागृत होत नाही तोपर्यंत महादुर्लभ, आणि आत्मोन्मुखी पुरुर्षार्थासाठी जो कंबर कसून संलग्न होतो त्याच्यासाठी महासुलभ.
बोधीलाभ सुलभ करण्यासाठी रत्नप्रय धर्माची उत्पत्ती, वृद्धी आणि पूर्णता प्राप्त करणचे चिंतन व तशी प्रक्रिया आवश्यक आहे. ही भावना शुभाशुभभाव विध्वंसनी, आनन्दजननी आहे.
धर्माचा संयोग मिळणे फार कठीण आहे. आर्यक्षेत्र, इत्यादी मिळणे कठीण आहे. सुख पूर्वक आजीविका, सदगुरु दर्शन, शास्त्रश्रवण, मनन आणि चिंतन इत्यादी मिळणे फार कठीण सांगितले आहे. हे सर्व मिळाले तरी भव्यत्व, सम्यक्त्व, शीलता, सुलभ बोधकता, स्वल्प कर्मशीलता इत्यादी प्राप्त होणे कठीण आहे. असे सर्व संयोग मिळाले तरच धर्माची रुचि जागृत होते. नंतरच बोधी बीज रूप सम्यक्त्वाची प्राप्ती होते. म्हणून विचार केला पाहिजे की अत्यंत पुण्योदयानेच आपण अशा उच्च अवस्थेपर्यंत पोहोचू शकलो आहे. ह्या अवस्थेत आत्मरूपी क्षेत्रात सम्यक्त्व रूपी बी पेरून ज्ञान रूपी जल द्वारा त्याचे सतत पालन पोषण केले पाहिजे ज्याच्याने धर्म रूपी वृक्ष उत्पन्न होईल आणि मोक्षरूपी फळाची प्राप्ती सहजतेने होईल.
बोधी दुर्लभतेने प्राप्त होते हे सांगण्यामागे हेतू हा आहे की ती अत्यंत मूल्यवान आहे. कारण जे मूल्यवान जास्त तेच मिळणे दुर्लभ आहे आणि जे दुर्लभ आहे. मूल्यवान आहे ते मिळवण्यासाठी आपला मन लोलुप होतो आणि आशी दुर्लभ वस्तू मिळाल्यानंतर दुर्लभ आणि किंमती समजून त्याचे बरोबर रक्षण केले जाते. कारण ती वस्तू जर हातातून गेली तर पुन्हा लवकर मिळत नाही. तशी बोधीपण हातातून गेली तर अनंतकाळ गेल्यानंतर भाग्यानेच मिळू शकते म्हणून मिळाली नसेल तर मिळवण्यात आणि मिळाली असेल तर त्याला आजून शुद्ध करण्याची त्याचे रक्षण करण्याची काळजी घेतली पाहिजे. संसाराच्या सगळ्या पदव्या, ऋद्धी, संपत्ती सर्वकाही प्राप्त होऊ शकेल. पण बोधीरत्न मिळणे फार कठीण आहे आणि जर ते एकदा प्राप्त झाले तर संसार परिभ्रमण कमी झाले समजावे.