________________
याविषयी आचार्य कुंदकुंद म्हणतात - ज्या उपायामुळे सम्यगज्ञान प्राप्त होऊ शकते. त्या उपायाचे सतत चिंतन करणे म्हणजे बोधिदुर्लभ भावना होय. कर्माच्या यामळे उत्पन्न शुद्ध निश्चयनयानुसार कर्मोदय जनित क्षयोपक्षम ज्ञान, पर द्रव्य किंवा पर्याय आहे. म्हणून हेय आहे. त्याग करण्यायोग्य आहे. सम्यग्ज्ञान आत्माचा निज भाव आहे. म्हणून उपादेय म्हणजे ग्रहण करण्यायोग्य आहे.४३४
बोधीची दुर्लभूताचे वर्णन करताना ग्रंथकार आ. वट्टकेर म्हणतात की, जीवाने असे चिंतन करावे की जर सम्यग्दर्शनाशिवाय हे जीवन संपले तर पुन्हा मानव जीवन मिळणे महाकठीण आहे. म्हणून प्रमाद आळस इ.चा परित्याग करून या मार्गाचा त्वरित अवलंब करण्यात प्रयत्नशील व्हावे. बोधी प्राप्त करण्यासाठी जो असा प्रमादशील असतो तो कायर आहे; मग दुर्गती प्राप्त झाल्यावर शोक करण्याशिवाय पर्यायच नाही. म्हणून जो खरा मुमुक्षु आहे. भव्य प्राणी आहे, सम्यक्त्व प्राप्त करणे हाच त्याचा परम ध्येय बिंदू असतो. ते प्राप्त करण्यात परमकल्याण मानतो. ग्रंथकाराने औपक्षमिक क्षायिक, - क्षायोपक्षमिक सम्यक्त्त्वाची चर्चा केली आहे. आणि सांगितले आहे की अक्षय, अविनश्वर सौख्य आत्मकल्याणाचा हा मार्ग आहे.
शेवटी आचार्य आपले मंतव्य स्पष्ट करताना म्हणतात- मी सुद्धा आरथा, संवेग, भव-वैराग्य, शक्ती-आत्मपराक्रम, विनय-विनम्रता द्वारा माझा आत्म्याला ह्या अनुप्रेक्षांनी, भावनांनी भावित करीत राहीन. ज्यामुळे प्राप्त झालेली बोधी चिरकालापर्यंत टिकून राहू शकेल. बोधीचे फळ काय मिळते याबद्दल ते म्हणतात- त्यामुळे जीव पुद्गलादी पद्रव्य तथा नऊतत्त्वांचे ज्ञान होते. इतकेच नव्हे तर बोधीमध्ये हजारो-लाखो गुण भरलेले आहेत.४३५
- बोधी सम्यकज्ञान खरोखर जीवनाचे सारतत्व आहे. सम्यक्त्त्वाशिवाय जीवन निस्सार, निरधर्म आहे. परंतु सम्यक्त्व प्राप्त करणे इतके सोपे नाही. फार कठीण आहे. कार दुर्लभ आहे. अशाप्रकारचे मनात चिंतन पर्यालोचन करणे बोधिदुर्लभानुप्रेक्षा आहे. अशाप्रकारचे चिंतन केल्याने चिंतन करणाऱ्याला सत्स्वरूपाकडे जाण्याची प्रेरणा मिळते.
मिथ्यात्वाच्या अंधःकारातून बाहेर निघून सम्यक्त्वाच्या प्रकाशाकडे होपावतो. हाच मानव जीवनातील सुवर्णकाळ आहे. जे त्याला अद्याप मिळाले नव्हते. ग्रंथकार याच सदमाला लक्षात ठेवून सांगतात की, जीव अनादिकाळापासून अंनतकाळापर्यंत निगोदात वास्तव्य करतो. तेथून बाहेर पडून पृथ्वीकाय इ.मध्ये उत्पन्न होतो.