________________
लोक भावनेमध्ये लोकच्या स्वरूपाचे आकार प्रकाराचे जीवाजीब इत्यादी पदार्थाचे जे विस्तृत विवेचन केले आहे ते व्यवहार रूप आहे. निश्चय लोक तर चैतन्यलोक आहे व्या चैतन्य लोकमध्ये रमण करण्याची भावना निश्चय लोक भावना आहे. कारण लोकभावनेच्या चिंतनाचा उद्देश्य तर आत्माराधनेची सफल प्रेरणाच आहे. म्हणून सर्व आत्मार्थीजन घटद्रव्यमय लोकाला जाणून स्वचैतन्य लोकमध्ये रममाण होऊन अनन्तसुख प्राप्त करावे.
साधकाने लोकची विविधता पाहून त्याच्या हेतूचा विचार करावा आणि शेवटी चैतन्याचे ध्यान करावे. ह्या लोकची विचित्रता अशी आहे की ती पाहून कधी घृणा येते तर कधी अभिमान पण त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी व समत्व भावना प्राप्त करण्यासाठी लोकभावनेचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे.
___ पाप कर्माने वाचण्यासाठी, वासना, क्रोध इत्यादीच्या आक्रमणाने वाचण्यासाठी संपूर्ण लोक सोडून आत्मलोकमध्ये प्रवेश करावा. जसे कासव स्वतःवर संकट आले अथवा एखादी असुरक्षितता, भय उत्पन्न झाले असता लगेच आपल्या ढाली सारख्या चमड्यात प्रवेश करतो. त्याला नैसर्गिक आशी चमडी मिळाली आहे की जी त्याच्यासाठी ढालीचे काम करते. कासव जेव्हा चमड्यात प्रवेश करतो तर सर्व प्रकारे सुरक्षित होतो. तसेच आपण ह्या जगाची माया सोडून अध्यात्मात प्रवेश केला. चेतनेजवळ गेलो तर सुरक्षित बन्. जोपर्यंत बाहेर भटकू तोपर्यंत वासनेच्या आवेश, चिन्ता, भय, आणि दुःख उत्पन्न करणारी प्रत्येक परिस्थित उपस्थित होऊ शकते. परंतु आत्मलोकाजवळ राहिलो तर संपूर्ण सुरक्षित होऊ. तेथे कोणत्याही प्रकारचे भय नाही कारण ती एक ज्वलंत शक्ती आहे.
आपल्या बाह्य प्रवृत्तीने निवृत्त होऊन, रागद्वेषाच्या उठणाऱ्या तरंगाचे सम्यक अवलोकने करून स्वतःला तटस्थ ठेवणे हाच लोक भावनेचा अभिप्राय आहे.
- तत्त्वज्ञानाच्या विशुद्धीसाठी लोकाच्या वास्तविक स्वरूपाचे चिंतन करणे लोकभावना आहे. लोकस्वरूप भावनेत विश्वस्वरूपाचे दर्शन स्पष्ट आणि विस्तृतपण केल गल आहे. आता जन्म मरणाच्या आवागमनाचा अंत करून लोकाग्रस्थानी पोहोचणे हाच एक मात्र लक्ष्य आहे.
जगातले सर्व जीव लोकमध्ये राहतात. अशुद्ध अवस्थेत देखील लोकमध्ये रहातात पूर्ण शुद्ध झाल्यानंतर देखील लोकमध्ये राहतात. यांच्या आवासाची आत्मविकासाची आधारभूमी लोक आहे. म्हणून लोकाचे स्वरूप, आकार, प्रकार, रचनेची मूळ तत्त्वे, शाश्वत
Solaps