________________
अशाश्वत इत्यादीचे चिंतन लोक भावनेत केले जाते.
लोक स्वरूपाच्या चिंतनाचा हा धर्म आहे की जीव समूल आणि त्याच्या याचे स्थान ज्यामध्ये आपण देखील एक आहोत. ज्याप्रमाणे एका घरामध्ये राहणाग माय आपल्या घरासंबंधी विचार करतो, त्याचा आधार आणि उत्थानाचे चिंतन करतो याच प्रमाणे मनुष्य या लोक गृहाचा सदस्य आहे. अन्य जीव समूहांबरोबर त्याचेही येथे दायित्व आहे आणि तो स्वतः चिंतनाद्वारे पाहू शकतो की जे जीव धर्माचे आचरण करतात ने जगात कसे सुखी होतात, कशा प्रकारे उच्च जाती, कुल इत्यादीमध्ये जन्म घेतात आणि जे जीव अधर्माचे आचरण करतात ते नरक व निगोद इत्यादी दुर्गतींना प्राप्त करून कशा प्रकारे कष्ट प्राप्त करतात.
ज्याला इहलोक, परलोक, चतुर्गती वर विश्वास आहे तोच ह्या भावनेचे चिंतन करतो.
लोकभावना एक प्रकारे अनादिकाळाच्या लोकयात्रेचा अन्त शोधण्याची एक गुरुकिल्ली आहे. लोक स्वरूप समजून भव भ्रमणापासून मुक्तीसाठी प्रयत्न करण्याचा एक प्रेरणा स्पद ध्वनी आहे. शंख नाद आहे.
बोधिदुर्लभ भावना
सलमाM4500AMONTHS
मानवाच्या जीवनात जे. काही क्रियाकलाप होतात त्याच्यामागे त्याची आस्था, विश्वास प्रेरक असतात. ज्याच्या मनात हा विश्वास आहे की हा देह आणि त्याचे भोग है साध्य आहेत ते प्राप्त करणे हे ध्येय आहे आणि ते प्राप्त करण्यासाठी सतत उद्यमशील राहतो. ते प्राप्त करण्यात ज्या काही आडकाठी येते ती दूर करण्यासाठी योग्य-अयोग्य मागान ते दूर करण्यात किंवा प्राप्त करण्यातच सर्व शक्ती खर्च करतो. त्यावेळी तो हिसा-अहिंसा यांचा किंचितमात्र विचारसुद्धा करीत नाही. निःसंकोचपणे हिंसक व असत्याचा आधार घेऊन आपल्या कार्यात मग्न होतो. न्याय-अन्याय नीती-अनीतीचा यत्किंचितही विचार करीत नाही.
ज्याचा विश्वास सत्यावर आधारीत आहे. सत् तत्त्वात ज्याची आस्था आहे. आत्म्याच्या पारमार्थिकतेला जो जाणतो, त्याच्या जीवनाची क्रियाप्रक्रिया कार्यविधा वरील "पक्षा पूर्णपणे भिन्न असते. त्याचे जीवन भोगविरती, आत्मविरती, संयतचर्याकडे " असते. विश्वास व आस्थाच ज्याचा केंद्रबिंदू आहेत त्यावर त्याच्या जीवनाचा नभर असतो. येथूनच सम्यकबोधीची यात्रा प्रारंभ होते. सम्यगबोधी त्या ज्ञानाची