________________
Malla
नारे विविध योनीमध्ये भ्रमण चालले आहे. जीव हा एक असा तत्त्व आहे. ज्याचा भाव असीम ज्ञान, असीम आनंद आणि असीम शक्ती युक्त आहे. परंतु तो आपले यस्वरूप विसरला आहे. म्हणून स्वतःला हीन समजतो आहे. या हीन भावनेचे निवारण
भावनांचे अनुशीलन केल्यामुळे होऊ शकते. लोक भावनेच्या समीक्षणामुळे तो एकीकडे लोकातील पुद्गलमय विराटता, आकाशमय अनंतता जाणतो तर एकीकडे तो जीवाची वास्तविक स्थिती आणि शक्तीला ही जाणतो. लोकस्वरूपाचे गंभीरतेने चिंतन केल्याने, त्याचा अनुभव, अनुभूत केल्याने अंतःकरणात आपल्या वास्तविक स्थितीचा भाव जागृत होतो. भावविचार किंवा चिंतनच अध्यवसायचा मूळ हेतू आहे. सत्यतापूर्ण भावामुळे पुरुषार्थ आणि उद्यम केल्याने सत्यान्मुखी क्रियाशीलता उद्भासित होते. परिणामस्वरूप आत्मजागृती, आत्मानुभव, अंतःपरिप्कार प्राप्त होतो.
जीवात्मा स्वता:च्या कर्मामुळे फळ भोगत असतो, पण त्याचा आरोप दुसऱ्यांच्या डोक्यावर चढवतो. ह्या वृत्तीमुळे तो दुःखी होतो आणि चतुर्गतीमध्ये परिभ्रमण करतो. अशा लोकांना कवी मतंगराय म्हणतात. जर तुला स्वतःच्या उत्थानाची हिताची इच्छा असेल तर
मोह कर्म को नाश मेटकर सब जग की आशा
निज पद में थिर होय लोक के शीश करो वासा ॥४२६ जगाची सर्व आशा सोडून, मोह कर्माचा नाश करून निजपद स्वात्म्यात स्थित हो. जर असे केले तर तुमचा निवास लोक शिखरावर होईल म्हणजे तुम्ही सिद्ध पदाला प्राप्त व्हाल. कारण सिद्ध भगवानच लोक शिखरावर सिद्धशिलेवर विराजित होतात.
लोकभावनेच्या चिंतनाचा परिणाम जगाचे ज्ञान प्राप्त करून मिथ्याभाव दूर करावा. षडद्रव्यमय लोकच्या स्वरूपाचे चांगल्याप्रकारे चिंतन करून स्वतःचे निरीक्षण करणे, आत्म्याचा अनुभव करणे कारण पडद्रव्य परद्रव्य आहे ते मात्र जाणण्या योग्यच आहे. पण आत्मा स्वद्रव्य असल्याने परम-उपादेय आहे, ध्येय आहे. मिथ्यादर्शन, मिथ्याज्ञान आणि मिथ्याचारित्ररूप मिथ्याभावाचे निवारण करण्यासाठी एकच उपाय आहे ते म्हणजे आत्म निरीक्षण. आत्मदर्शन करणेच सम्यग् दर्शन आहे. आत्म्याला जाणणे सम्यगज्ञान आहे आणि आत्म्याचे ध्यान करणे सम्यक्रचारित्र आहे.४२७
जगाला जाणून त्याच्या पासून विरक्त होणे व स्वआत्म्यात स्थिर होणे हा
SANAama
लोकभावनेच्या चिंतनाचा परिणाम आहे.