________________
र आहे असा विचार करून मग हृदयसरोवरात नवकार मंत्राला स्थापित करून. नऊ कल्या असलेल्या कमळफुलाची कल्पना करावी. एका एका पाकळीवर नवकार मंत्रातील एक-एक पद अंकित करावे.
नवकारचे पद अंकित केल्यानंतर त्या पदाचे ध्यान केल्याने पाप-पंक हटतील वमन सरोवराच्या चहुकडे संवराचा बांध घालून व जगातील सर्व जंजाळातून मुक्त होऊन परमहंस, परमात्मपदाचे ध्यान करावे. असे केल्याने हे भवी जीवा ! मनरूपी मानस सरोवरात रमण करणाऱ्यांनो, हंसातून परमहंस पदवी प्राप्त करा. ३२९
- पूढे काव्यात श्रीजयसोममुनी लिहितात की, हे भव्यात्मा, या आठव्या संवर भावनेचे एकाग्र होऊन चिंतन कर, समिति, गुप्ति धारण करून हे सुलक्षणी जीवा, तू शांति सुधारसाचा आस्वाद घे. हा मनरूपी भ्रमर तर विषयरूपी फळ-फुलांवर भटकत राहतोच अर्थात मन वारंवार इंद्रियांच्या विषयात भटकत आहे. त्याला आळा घालून शांतीउपशम प्रशममध्ये स्थिर कर. आत्म्यात सहजपणे असलेली तृप्ती, अनिच्छा, उदासीनतामध्ये स्थिर कर. याने मनोगुप्तीचा संवर साध्य होतो.
परिषह संवर साधण्यासाठी इष्ट वस्तुच्या प्राप्ती किंवा अप्राप्तीमध्ये मन आनंदित किंवा दुःखी करू नये, समभावात रहावे. जीवन-मृत्यूला समान समजावे. अर्थात् जगण्याचा लोभ नाही, मरणाचे भय नाही. शत्रू मित्रांच्या मान अपमानात समभाव ठेवावा.३३०
__ या श्लोकात कवीचा आशय असा आहे की, इष्ट लाभ किंवा अलाभ याने आत्म्याच्या ज्ञानादी संपत्तीमध्ये कोणताच फरक पडत नाही. आणि अरूपी ज्ञानमय शुद्ध आत्मस्वरूपाला जीवन मरणाने कोणतीही हानी किंवा लाभ होत नाही. शत्रू वा मित्र आत्म्याचे काहीच बिघडवू शकत नाहीत. आणि आत्म्याचे खरे शत्रू तर क्रोध वगैरे आहेत खरा मित्र धर्मात स्थित आत्मा आहे. मान-अपमानात नाराज किंवा राजी होण्यासारखे काहीच नाही. कारण त्याने पाप-पुण्याचे बंध होत नाहीत. व सद्गती, दुर्गतीही होत नाही. असे सतत चिंतन केल्याने परिषहावर सहजपणे विजय मिळू शकते.
यतिधर्म नावाच्या संवर भावनेत श्रावकाने असा विचार करावा की कधी मी बाह्य सुख-पैसे, कुटुंब इ. परिग्रहापासून अलिप्त होईन ? कधी मी संयमी जीवन स्वीकार करीन, आणि कधी ती संपूर्ण जीवनाचे सार करणाऱ्या अशा अंतिम अवस्थेत संथारा व्रत म्हणजे भत्त परिज्ञा, इंगित मरण तथा पादोपगमन अनशन ग्रहण करीन ?२२१
Akashatideso
अन्य लेखकांनी परिषहजय यात २२ प्रकारच्या परिपहांचे वर्णन केले आहे. परत
-