________________
सक्ष्म-सक्षम आहेत. कारण की तो सर्वावधिज्ञानाचा विषय आहे. जो देने पूर्ण असतो त्या पुद्गलास "स्कंध" म्हणतात. स्कंधाच्या निम्म्याभागाला 'देश' मातात. ह्या निम्म्याच्याही निम्या भागाला 'प्रदेश' म्हणतात. आणि ज्याचा दुसरा भाग होऊच शकत नाही त्यास परमाणू म्हणतात. परमाणूचा आदीही नाही आणि अंतही नाही. प्रमाणंच्या साह्याने स्कंध बनतो. तो इंद्रियांनी दिसत नाही. तो अखंड आणि अविभागी असतो. १२२
शब्दाचे वर्णन करताना ग्रंथकारांनी लिहिले आहे- शब्दाचे दोन भेद आहेत. भाषात्मक व अभाषात्मक, भाषात्म शब्दाचेही अजून दोन भेद आहेत. अक्षरात्मक आणि अनाक्षरात्मक, संस्कृत, प्राकृत अपभ्रंश व पैशाचिक भाषा इ. भेदाप्रमाणे अक्षरात्मक शब्द अनेक प्रकारचे आहेत. ते आर्य आणि म्लेच्छ मानवांच्या व्यवहारात सहायक होतात.
द्विइंद्रिय इ. तिर्यंच जीवात तथा सर्वज्ञांच्या दिव्य ध्वनीत अनक्षरात्मक भाषेचा व्यवहार होतो.
अभाषात्मकाचे सुद्धा प्रायोगिक तथा वैस्वसिक असे दोन भेद आहेत. जो शब्द प्रयत्न केल्याने उत्पन्न होतो त्यास प्रायोगिक म्हणतात. त्याचे चार भेद आहेत- १) तत् २) वितत् ३) धन आणि ४) सुषिर. वीणा वगैराचा शब्दालातत् म्हणतात. ढोल वगैरेच्या शब्दाला वितत म्हणतात. कास्याच्या वाद्यातील शब्दाला धन म्हणतात. बासरी इ.च्या शब्दाला सुषिर म्हणतात.
जो शब्द स्वभावानेच शब्द असतो त्यास वैखासिक म्हणतात. स्निग्ध तथा रुक्ष गुणाच्या निमित्ताने वीज, ढग, इन्द्रधनुष्य इ. बनतात. त्यांच्या शब्दाला वैसासिक शब्द म्हणतात. ते अनेक प्रकारचे असतात.४२३
पुद्गल द्रव्य, जीवावर अनेक प्रकारे उपकार करतात. त्याला सुख देतो तसेच दुःखही देतो. जीवित ठेवतो किंवा मारून टाकतो. औदारिक इ. शरीराची रचना करतात. स्थान, रसन, प्राण, चक्षू व श्रोतोन्द्रियाची रचना करतो. तत, वितत, घन, सुपिर रूप बना किवा सात स्वर रूप शब्दांना अथवा बावन अक्षरात्मक व अनाक्षरात्मक वाणीची ना करतात. श्वास-निश्वास प्राण, अप्राण, वायूची रचना करतात.
जा पर्यत जीव संसारात राहतो. तोपर्यंत पुदगल द्रव्य अशाप्रकारे अनेक उपकार करीत असतात. मोह व अज्ञानमय परिणाम पण करतात.
कर्म सुद्धा पौद्गलिक आहेत कारण की, त्याचा विपाक काठी, काटा इ. मूर्त