________________
तात. आणि आत्मपराक्रमी असतात. त्यांचे मिथ्यात्व मोहनीय, सम्यक्त्व मोहनीय व अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ, अप्रत्याख्यानावरण, क्रोध, मान, माया, लोभ आणि पत्याख्यानावरण रूप कषाय यथासंभव उपशांत असतात. उपसर्ग, परिपह इ. बाधक परिस्थिती आली तरी ते आपल्या व्रतांपासून विचलित होत नाहीत.
जो जीव अविरत सम्यगदृष्टी - चौथ्या अविरत गुणस्थानवर्ती, उपशम सम्यकदृष्टी, वेदक सम्यकदृष्टी आणि क्षायिक सम्यकदृष्टी असतात. ते जघन्य अंतरात्मा म्हटले जातात ते जिनेंद्र भगवानाच्या चरणकमलाचे भक्त असतात. अणुव्रत महाव्रत इ. गुणांना ग्रहण करण्यात फार रुची ठेवतात. गुणानुरागी हा गुण असल्यामुळे गुणीजनांचे प्रशंसक असतात. प्रेमळ असतात. गुणी लोकांना पाहून अत्यंत प्रमोदित होतात.
रस, रक्त, मांस, मेद, अस्ती, मज्जा तथा शुक्र या सात धातूंनी तसेच मलमूत्रादी सात उपधातूंनी रहित परम औदारिक रूप चवतीस अतिशयांनी युक्त, अष्टप्रतिहार्य व अनंतचतुष्टय युक्त अर्हत देव आहेत. हे त्रयोदश तथा चतुर्दश गुणस्थानवर्ती जिनेंद्र देव व मुक केवली इ. ज्यांनी केवलज्ञान, केवलदर्शन द्वारा भूत, वर्तमान व भावी जीव इ. समस्त परदार्थांच्या पर्यायांना एकदम जाणले आहे आणि पाहिले आहे ते आहेत-परमात्मा.
दुसरे परमात्मा सिद्ध परमेष्टी आहेत. यांचे केवलज्ञान आणि केवलदर्शन हेच शरीर असते अर्थात जे अशरीरी आहेत. जे सर्वोकृष्ट सुख आणि अनंतवीर्यांनी युक्त आहेत. सम्यक्त्व इ. अनंतगुण सहित आहेत.
समस्त ज्ञानावरणादी कर्मांचा क्षय झाल्यावर तसेच कर्मजन्य, औदयिक, क्षायोपक्षमिक व औपशमिक राग, द्वेष, मोह इ. भावांचा संपूर्णत: नाश झाल्यावर आध्यात्मिक शोभा, सुंदरता, ज्यांना प्राप्त होते ते असतात-परमात्मा. ते घातीकर्माना नष्ट करून अनंत चतुष्टय रूप आभ्यंतरीक लक्ष्मी तथा समवसरण रूप बाह्य लक्ष्मीला प्राप्त करणारे अरिहंत परमात्मा आहेत. ते पण समस्त कर्मांचा तथा कर्मामुळे उत्पन्न
यक इ. भावांना नष्ट करून आत्मस्थ भाव रूप लक्ष्मी प्राप्त करून सिद्ध परमात्मा होतात.
_अनादी काळापासून द्रव्य, क्षेत्र, काळ आणि भाव या अनुसार किंवा चार गतींच्या घटान संसारात भटकणारे सर्व प्राणी ज्ञानावरणादी कर्माच्या श्रृंखलेने बद्ध असतात. ते अकृतीबंध, स्थितीबंध, अनुभागबंध, प्रदेशबंधच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या, कर्मबंधनांना तोडून नमल रूपी कलंक रहित होऊन जातात. तेव्हा ते शुद्ध, बद्ध, स्वरूपयुक्त जन्म, जन