________________
मनुष्य, देव नारकी तथा पशू इ. जीवांना सकलेन्द्रिय जीव म्हणतात. कारण कांना पाचही इंद्रिये असतात. पंचेन्द्रिय तिर्यंच जीव तीन प्रकारचे आहेत. १) जलचर
लिचर ३) नभचर. यांचेही दोन-दोन भेद आहेत. एक मन सहित, दूसरा मन रहित त्यांना क्रमशः सन्नी आणि असन्नी म्हटले जाते.
काही जलचर जीव मासे, कासव इ. काही स्थलचर हत्ती, घोडा, गाय, म्हैस इ. काही नभचर पोपट, कावळा, बगळा इ.
तिर्यंच जीव जन्माच्या दृष्टीने दोन प्रकारचे आहेत. गर्भज आणि समुर्छिम. जे जीव गर्भाद्वारे जन्म घेतात ते गर्भज जीव. ते मातेच्या उदरात शुक्र रज घेऊन शरीर धारण करतात ते गर्भज आणि पुद्गल स्कन्ध ज्यांच्यामध्ये शरीर आकार रूपात परिणत होण्याची योग्यता असते असे एकत्रित होऊन शरीर रूपात बदलतात ते समुर्छिम. हे जीव गर्भज नसतात. इथे हे लक्षात ठेवले पाहिजे की, भोगभूमीत गर्भज तिर्यंच असतात. समुर्छिम नाही.
कर्मभूमीत गर्भज तिर्यंच, जलचर, स्थलचर, नभचर हे सन्नी आणि असन्नी अशा दोन प्रकारचे असतात.
भोगभूमीत स्थलचर. नभचर. तथा तिर्यंच सन्नीच असतात. जलचर तिर्यंच नसतात. अशाप्रकारे जीवांचे खूप विस्तृत वर्णन केले गेले आहे.४२० यामुळे साधकाला जीवांची, जी लोकभागात मुख्यत: आहे, त्यांचे विस्तृत ज्ञान प्राप्त होते. आणि अशा या विशाल जनसमुदायात आपले आस्तित्व कितीसे ? हा ही बोध प्राप्त होतो. जैन तात्त्विक अथात जीव द्रव्याचे खूप विस्ताराने वर्णन केले आहे. जे खरोखरच अनुपम आहे.
उत्कर्षाच्या दृष्टीने जीवाचे तीन भेद आहेत. बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा. परमात्माचे वेगळे दोन भेद आहेत- अर्हत् आणि सिद्ध.
बाह्य द्रव्य-शरीर, पुत्र, पुत्री, पत्नी इत्यादींना जे आत्मा समजतात. सर्वस्व मानतात. त्यातच लिप्त राहतात. घर संसारच ज्यांच्यासाठी सर्वस्व आहे. ते आहेत बाहरात्मा जे आत्म्याला शरीरापासून भिन्न मानतात. शरीर वेगळे, आत्मा वेगळा हा भेद शान जे समजतात ते अंतरात्मा. ते परम समाधीमध्ये स्थित होऊन देहाहून भिन्न ज्ञानस्वरूप मात्मा जाणतात ते अंतरात्मा 'परा' अर्थात सर्वाहून उत्कृष्ट 'मा' अर्थात अनंत चतुष्टय
अतरंग लक्ष्मी. तथा समोवसरण इत्यादी बाह्य लक्ष्मीपेक्षा विशिष्ट आहे. ते परमात्मा पाहत. ते ४६ गुणांनी युक्त परम देवाधिदेव अरिहंत आहेत आणि सम्यक्त्व इ. अष्टगुण