________________
(५००)
कशाचा तरी आधार लागतो पण सूक्ष्म जीव कोणत्याही प्रकारच्या आधाराशिवाय समस्त लोकात व्याप्त आहेत. पृथ्वीकायिक, जलकायिक, अझिकायिक तथा वायुकायिक जीव बादर (स्थूल) सुद्धा असू शकतात व सूक्ष्म पण असू शकतात. पाचवी वनस्पतीकायिक जीव दोन प्रकारचे असतात साधारण आणि प्रत्येक.
साधारण नाम कर्माच्या उदयामुळे साधारण वनस्पतीकायिक जीव राहतात ज्यांना निगोदिया पण म्हणतात. निगोदिया जीव बादर पण असतात आणि सूक्ष्म सुद्धा असतात. निगोदिया जीवांना साधारण म्हणण्याचे कारण हे आहे की त्या अनंत अनंत जीवांचा आहार श्वासोश्वास आयुष्य साधारण असते. म्हणून ते साधारणकायिक म्हटले जातात. ज्या अनंत अनंत निगोदिया जीवांचे साधारण नामकर्माचा उदय होतो त्यांचा आहार वगैरे सारखे असतात. तात्पर्य हे की अनंतानंत जीवांचा पिण्ड बनून एक जीवासारखा होऊन जातो. म्हणून त्या अनंतानंत जीवापैकी एक जीव जेव्हा आहार ग्रहण करती त्याचवेळी त्याच्या बरोबरीचे अनंतानन्त जीव आहार ग्रहण करतात. त्याचप्रमाणे एकाच वेळी श्वास घेतात आणि शरीर धारण करतात. त्यांच्यापैकी एकजीव मृत होऊन नवीन शरीर धारण करतो त्याच वेळी त्याच्या बरोबर ते सर्वच्या सर्व जीव वर्तमान शरीर सोडतात व लगेच नवीन शरीर धारण करतात. याचा सारांश असा आहे की, त्यांचे सर्वांचे जीवन एकमेकावर आधारीत आहे. म्हणून त्या जीवांना साधारण जीव म्हटले आहे.
याचे विशेष स्पष्टीकरण याप्रमाणे आहे- साधारण वनस्पतीकायिक जीव एकेन्द्रिय असतात. त्यांना आहार पर्याप्ती, शरीर पर्याप्ती, इन्द्रियपर्याप्ती, आणि श्वासोश्वास पर्याप्ती असतात. जेव्हा एखादा जीव जन्म घेतो तो जन्म घेण्याच्या प्रथम समयात आहार पर्याप्ती घेतो. नंतर अन्य पर्याप्त्या क्रमशः घेतो. आहारपर्याप्तीचे कार्य आहार वर्गणा रूपाने ग्रहण केले गेलेले पुद्गल स्कंधाचा खलभाग आणि रसभाग रूपात परिणत होणे असा आहे. खलभाग आणि रसभागाचे शरीरच्या रूपात परिणमन होणे शरीर पर्याप्तीचे कार्य आहे. आहार वर्गणाच्या परमाणूचे इन्द्रियांच्या आकाररूपात परिणमन होणे इंद्रिय पर्याप्तीचे कार्य आहे. आहार वर्गणाच्या परमाणुचा श्वासोश्वास रूपात परिणमन होणे श्वासोश्वास पर्याप्तीचं कार्य आहे. एका शरीरात राहणाऱ्या अनंतानंत साधारण कायिक जीवामध्ये या चारही पर्याप्त्या आणि त्यांचे कार्य समान आहे तसेच एका समयात (अवधी, काल) पूर्ण होते.
ज्या वनस्पतीरूप शरीराचा स्वामी एकच जीव आहे त्यास प्रत्येक जीव म्हणतात. अर्थात प्रत्येक वनस्पतीमध्ये एक जीवाचे एक शरीर असते पण साधारण वनस्पतीमध्ये