________________
(४९८)
निरूपण करतो. त्यामुळे लोकाच्या स्वरूपाचा सम्यक् बोध प्राप्त होतो.
लोक स्वरूपाच्या विस्ताराचे वर्णन करताना लिहिले आहे की- अधोलोक, मध्यलोक तथा उर्ध्वलोक किंवा ब्रह्मलोक रूपात त्याचे तीन भाग आहेत. म्हणून यास तिलोक किंवा त्रैलोक्य असे म्हटले जाते.
या अधोलोक पूर्व-पश्चिम दिशेच्या मूळात म्हणजे अधोलोकाच्या खाली सात रज्जू प्रमाण विस्तार आहे. अघोलोकाच्या वर क्रमशः कमी-कमी होत मध्यलोकाचा विस्तार एक रजू आहे. पुन्हा तो क्रमशः बाढत-वाढत ब्रह्मलोक या स्वर्गाच्या अंतापर्यंत पाच रजू विस्तार आहे. पुनश्च क्रमशः कमी होत होत लोकाच्या अंतापर्यंत एक रज्जू विस्तार आहे.
'रज्जू' जैन शास्त्रात एक विशेष मान-परिमाण सूचक आहे. ३८१२७९७० (तीन करोड ऐक्यांशी लाख सत्तावीस हजार नऊशे सत्तर) मण वजनाचा 'भार' असतो. या मापाप्रमाणे १००० 'भारा'चा लोखंडाचा एक गोळा एक शक्तिशाली देव वरून खाली फेकतो तो गोळा सहामहिने, सहा दिवस, सहा प्रहर सहा तास मध्ये जितक्या क्षेत्राला पार करून जातो तेवढ्या क्षेत्राला एक 'रज्जू' परिमाण म्हणतात.४१७ वरील प्रमाण शास्त्रामध्ये 'रज्जू' माप म्हणजे किती ? हे समजण्यासाठी ढोबळ उदाहरणाने समजावले आहे.
ग्रंथकाराने आकृती द्वार लोक हे पुरुषाकृती आहे असे सांगितले आहे. एका पुरुषाने आपले दोन्ही पाय फाकले आणि दोन्ही हात कमरेवर ठेवले त्याचा जसा आकार दिसेल तसाच लोकाचा आकार मानला आहे. याचे ही स्पष्टीकरण केले आहे की - दोन्ही पायामधील अंतर ७ रज्जू आहे. कटिप्रदेशाचा विस्तार एक रज्जू, दोन्ही हाथांच्या एका कोपरापासून दुसऱ्या कोपरपर्यंतचा विस्तार पाच रज्जू आहे. वर डोक्याचा विस्तार एक रजू आहे. हे पूर्व पश्चिम विस्ताराचे वर्णन आहे.
दक्षिण उत्तर सर्वत्र लोकाचा विस्तार सात रज्जू आहे. लोकची खालून वरपर्यंतची उची १४ रज्जू आहे. लोकाचे क्षेत्रफळ सातरज्जूचे घनफळ इतके आहे. तीन समान संख्यांचा गुणाकार केल्याने जी संख्या येते त्यास धन म्हणतात. याप्रमाणे सातरज्जूंचा घन उस = ३४३ रज्जू होतो.
'लोक' शब्द लुक धातूने बनलेला आहे. लुक् धातू पाहणे' या अर्थाने आहे. धमाधर्मादी निद्रव्याणि यत्र लोक्यन्ते स लोकः'' ४१८ ज्या क्षेत्रात धर्म, अधर्म, जीव पुद्गल, आकाश आणि काल यांचे अवलोकन केले जाते ते आहे लोक. लोकाच्या