________________
परिश्रमण करीत राहतात. या परिभ्रमणापासून मुमुक्षुला मुक्त व्हायचे आहे. मुक्ती मार्गाचा
अवलंब करायचा आहे.
कार्तिकेयानुप्रेक्षामध्ये एकशे पंधरा श्लोकापासून दोनशे त्र्याऐंशी श्लोकापर्यंत नोकाचे विवेचन आहे. विद्वत् वरेण्य स्वामी कार्तिकेय यांनी लोकाचे विस्तृत वर्णन तर केले आहेच त्याबरोबर तद्गत् द्रव्य तत्त्वांची जी व्याख्या केली आहे. ती फारच अधिक ज्ञानवर्धक आहे. वैज्ञानिकांनी सुद्धा वैज्ञानिक दृष्टीने लोकाबद्दल गंभीर चिंतन केले आहे आणि बरेच तथ्य उद्घाटित केले आहे. त्यांचा शोध आज सुद्धा चालू आहे. ज्ञानाचा विषय अत्यंत विस्तीर्ण आहे. अनेक अनेक जन्म व्यतीत झाले तरी त्याचा पत्ता लागणे फार कठीण आहे. सर्वज्ञ प्रभुंनी निरूपित केलेले अनेक तथ्य आज विज्ञानाच्या कसोटीवर सत्य सिद्ध होत आहेत. उदा. धर्मास्तिकायचे उदा. पाहू या. गतीमध्ये असाधारण रूपात सहायता करणारा धर्मद्रव्य समस्त लोकात व्याप्त आहे. अलोकात ते नाही. म्हणून ते गतिशन्य आहे. अलोकात फक्त आकाश द्रव्यच आहे.
वैज्ञानिकांनी इथर नामक असा एक पदार्थ शोधला आहे जो साऱ्या जगात व्याप्त आहे. आपल्या हलन-चलनात त्याची अत्यंत आवश्यकता आहे. तो अभौतिक आहे. अपरमाणू आहे. इथरा (Eather)ची ही व्याख्या जवळजवळ धर्मास्तिकाय सारखीच आहे. जैन दर्शनानुसार वनस्पतीमध्ये जीवत्व आहे. त्याला बेदना आणि पीडा दोन्ही जाणवतात. जगातील महान वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र वसू यांनी वनस्पतींचे सूक्ष्म अन्वेषण केले. आणि सिद्ध केले की वनस्पती सजीव आहेत इतकेच नव्हे तर त्यांना आनंद दुःख इ.ची अनुभूती सुद्धा होते.
- जैनदर्शनात तर वनस्पती सजीव आहेत हे केव्हाच सिद्ध केलेले आहे. यावरून जैनदर्शनात असलेल्या अनेक सत्य गोष्टी पुढील काळात विज्ञान संशोधनाने सिद्ध करून दाखवतील.
स्वामी कार्तिकेयांनी लोकविषयी केलेले विशेषणाची इथे थोडक्यात चर्चा करणे उपयुक्त होईल. त्यांनी प्रतिपादित केले आहे की, लोक अकृत्रिम आहे. अनादी अनत आहे, स्वभावाने निष्पन्न आहे. जीव-अजीव द्रव्याने परिव्याप्त आहे. आकाश एक अंग आहे आणि ते नित्य आहे. कार्तिकेयानप्रेक्षाचे टीकाकार आचार्य श्रीशुभचंद्रांनी मूळग्रंथात निरूपित तत्यांनी
पत तत्त्वांचे विशेष विश्लेषण केले आहे. एक शंका उपस्थित केली आहे की, जर क सर्वथा नित्य आहे तर स्यावाद सिद्धान्ताचे खण्डन होते. कारण स्यादवाद