________________
(४९४)
होऊन लोक-स्वरूपाचे ध्यान करतो, तो कर्माच्या समुदायांना ध्वस्त करून तीन लोकांचा शिरोमणी होऊन जातो. मग मुक्त सिद्ध बनून लोकाग्र भागात स्थित होऊन जातो.
लोकाची आकृती, प्रमाण इ. चे विवेचन करताना मूलाचारामध्ये आचार्य बकेर म्हणतात- जीव आपल्या संचित शुभाशुभ कर्माच्या परिणामानुसार अनेक प्रकारचे कष्ट भोगतात. हा लोक धिक्कार योग्य आहे, जिथे परम ऋद्धशाली देव, इन्द्र इ. अनुपम सुख भोगून पुन्हा घोर दुःखात पडतात. लोकाच्या ह्या स्वरूपाला समजून साधकाने असे चिंतन करावे की वास्तविक आपल्यासाठी तेच स्थान प्राप्त करण्यासारखे आहे. जे लोकाग्र भागात सिद्धशीला स्थित आहे. त्याचेच ध्यान करावे, लोक परित्याज्य आहे. हे आपले शाश्वत स्थान नाही. लोकाग्र शिखरवर्ती मोक्ष स्थान सर्वथा निरुपद्रव आहे, शाश्वत आहे. ४१३
संसारभावनेनंतर भगवती आराधनामध्ये लोकानुप्रेक्षा किंवा लोक भावनाचे वर्णन आहे. ज्याचे अगोदर वर्णन झाले आहे. आचार्य कुंदकुंद कृत द्वादशानुप्रेक्षा तथा आचार्य बट्टकेर रचित मूलाचारमध्ये असेच वर्णन आहे. ह्यात संसारगत संबंध व स्थान विजेप्रमाणे चंचल, केसाप्रमाणे दुर्बल, रोगग्रस्त आणि मृत्यूने पीडित अशा या जगाला पाहून ज्ञानी जन यात कधीच अनुरक्त होत नाहीत. या लोकदशेचे चिंतन केल्याने वैराग्य भाव उत्पन्न होतो. ज्यामुळे कित्येक पुण्यवान संसारदशेतून मुक्त होतात. लोकानुप्रेक्षाचा आधार लोकस्वरूपाचे चिंतन आहे. जो सर्वत्र वैचारिक दृष्टीने एकसारखा आहे. जैनागमामध्ये या लोकांचे विस्तृत वर्णन केले गेले आहे..
आचार्य शुभचंद्र लिहितात - हे अनादि आहे न याचा प्रारंभ आहे न ही अंत आहे. हे स्वयं सिद्ध आहेत. कोणाच्याही द्वारे रचित नाही. अनश्वर-नाश रहित आहे. हे अनिश्वर आहे, कोणी ही याचा स्वामी, ईश्वर, प्रभू किंवा सृष्टा नाही. हे जीवादी पदार्थांनी युक्त आहे. ४१४
आचार्य शुभचन्द्र द्वारा वर्णित "या लोकांचे स्वरूप" जैन दर्शनातील एक अतिशय महत्त्वपूर्ण सिद्धान्त उद्घाटित करणारा आहे. जैन दर्शन ईश्वर कर्तृत्ववादी नाही. जैन दर्शनानुसार जगाचा निर्माता, कर्ता कोणी नाही. हा लोक अनादी अनंत काळापासून होता आणि पुढे अनंत काळापर्यंत असाच चालू राहील.
या विशाल लोकात मानवाचे कितीसे आस्तित्व याचा विचार केला तर त्याचे स्थान नगण्य असे आहे. तरी ही मनुष्य आपल्या स्वतःला किती श्रेष्ठ, महान, विशेष मानतो. ही मानवाची मिथ्या धारणा आहे भ्रान्त धारणा आहे. ती या विराट लोकाचे