________________
SHREE
निमय अर्थात् द्रव्यात असलेली एकता आणि भिन्नता जाणणे, पाहणे. हाच त्याचा गण होय. पुद्गलास्तिकायचा स्वभाव वर्ण, गंध, रस व स्पर्श आहे.४०९
'वारसाणवेक्खा' मध्ये लोकाची परिभाषा करताना ग्रंथकाराने लिहिले आहेजीवादी पदार्थांचा समवाय म्हणजे लोक. 'आदी' शब्दाने इथे पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल यांना ग्रहण केले आहे. म्हणूनच पद्रव्यात्मक लोक असे म्हटले जाते. प्रत्येक द्रव्य आपल्या मूळ स्वरूपाच्या दृष्टीने नित्य आहे. म्हणून हा लोक सुद्धा नित्य आहे. अधोलोक, उर्ध्वलोक, मध्यलोक असे याचे तीन विभाग आहेत.
ढच्या श्लोकात या तीन्ही लोकांचे संक्षिप्त वर्णन आहे. अधोलोकात नारकीचे जीव राहतात. मध्यलोकाच्या विस्ताराचे वर्णन आहे त्यात असंख्यात द्वीप आणि असंख्यात समुद्र आहेत. उर्ध्वलोकात स्वर्गाचे ६३ पटल आहेत. आणि सर्वांच्या उच्चस्थानी मोक्ष आहे. ४१० पुढे लोक संबंधित अन्य माहिती दिली आहे की -
अशुभोपयोगामुळे नर्क तथा तिर्यंच योनी, शुभोपयोगामुळे देव व मनुष्य योनी प्राप्त होते. शुद्धोपयोगामुळे मोक्ष प्राप्त होतो.४११ अशुभ व शुभ योग आस्रवच्या अर्थाबद्दल आले आहेत. शुद्धोपयोग संवर व निर्जराशी संबंधित आहे. योग शब्दाच्या अगोदर जे उपसर्ग आले आहेत. ते सामिप्य बोधक आहेत. योगप्रवृत्तीच्या जवळ जाणे किंवा त्याच्याशी जुळणे, उपयोग आहे. शुद्धोपयोगात हे सामिप्य, जुळणे आत्म्याशी होते. संवर कर्म निरोधाचा पर्यायवाची आहे जो आत्मभाव आहे. निर्जरा, आत्म्यावरील कालुप्य निर्जरण करण्याच्या अर्थाने आहे. कर्म निर्जराने आवृत्त आत्मा भाव परावृत्त या उन्मुक्त होतो जी आत्म्याची शुद्धावस्था आहे.
कार्तिकेयानुप्रेक्षामध्ये एकशे पंधरा गाथापासून दोनशेत्र्याऐंशी गाथापर्यंत लोकाच्या स्वरूपाचे विस्तृत विवेचन आहे.४१२
संसारात जीवाचे भटकणे पुद्गल परावर्तन, द्रव्य, क्षेत्र, काल, भाव, भव इ.चे याप्रसंग विशद विवेचन केले आहे. बहिरात्मभाव, अंतरात्मभाव, परमात्मभाव यांचे ही
षण केले आहे. गणिताच्या दृष्टीने अनेक विषयांचे विस्ताराने विवेचन केले आहे. गुण, पयाय, उत्पाद, व्यय, धौव्य, आस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रेमयत्व, अगुरुलधुत्य, चतनत्व, अचेतनत्व, प्रदेशत्व, अप्रदेशत्व, मूर्तत्व, अमूर्तत्व इ.ची चर्चा केली आहे. गुण, या पयाय, स्वभाव इ. अनेक गुण विषयांचे विविध प्रसंगानुरूप प्रतिपादन केले आहे.
च वर्णन करताना शेवटी म्हटले आहे जो पुरुष उपशममय परिणामांनी अनुप्रेरित