________________
(४९१)
mandal
जैन आगमात व्याख्या प्रज्ञप्ति (भगवतीसूत्र) तथा सूत्रकृतांग सूत्र इ.मध्ये लोकाचे विवेचन केले आहे. सारांश असा आहे की, लोक द्रव्य अपेक्षेने सांत आहे. कारण संख्येच्या दृष्टीने एक आहे. परंतु भाव अपेक्षेने किंवा पर्याय अपेक्षेने ते अनंत आहे. काळाच्या दृष्टीनेसुद्धा लोक अनंत आहे. शाश्वत आहे. कारण असा कोणताही काळ नाही ज्यात लोकाचे अस्तित्व नाही.
भूत, वर्तमान, भविष्य तीनही काळात लोकाचे आस्तित्व आहे. परंतु क्षेत्र दृष्टीने लोक सांत आहे. कारण समस्त क्षेत्रापैकी काही क्षेत्रातच लोक आहे अन्य ठिकाणी नाही.४०५
इथे प्रयुक्त केलेले शब्द सांत आणि अनंत ह्याने अनेकान्तवाद सिद्धांताची स्थापना होते. 'लोक'ची शाश्वतता, अशाश्वतता विषयी भगवान बुद्धांनी लोक हे अव्याकृत आहे असे म्हटले आहे. भ. महावीरांनी अनेकांतवादाच्या आधाराने त्याचे विवेचन केले आहे. भगवती सूत्रात प्रसंग आहे - "जमाली आपल्या स्वतःला अर्हत् समजत होता. गौतम गणधरांनी 'लोक'ची शाश्वतता, अशाश्वतताबद्दल प्रश्न विचारला, जमाली उत्तर देऊ शकला नाही. तेव्हा भ. महावीरांनी त्याचे समाधान करताना सांगितले, "जमाली ! हा लोक शाश्वत पण आहे आणि अशाश्वतही आहे. त्रिकाळात असा एक सुद्धा क्षण नाही की लोक कोणत्या ना कोणत्या रूपात नसेल. म्हणून लोक शाश्वत आहे. तरीपण ते अशाश्वत पण आहे. कारण की ते सतत एकारूपात रहात नाही. त्यात अवसर्पिणी आणि उत्सर्पिणीमुळे अवनती, उन्नती होत राहते. जे शाश्वत असते त्यात परिवर्तन नसते. म्हणून त्यास अशाश्वत पण मानले पाहिजे.४०६
_ लोक काय आहे ? भगवान महावीरांच्या शब्दात पाच अस्तिकाय म्हणजेच लोक आहे. धर्म-अधर्म, आकाश, पुदगल आणि जीवास्तिकाय हे पाच अस्तिकाय आहेत.१०७
लोक स्वरूपाचे एक उपमा देऊन विश्लेषण केले आहे की- जमिनीवर अगोदर एक मातीचा वाडगा अर्थात एक पसरट भांडे उलटे ठेवून त्याच्यावर एक दुसरे तसेच ।। भाडे सरळ ठेवायचे त्यावर एक उलटे असे भांडे ठेवले तर जी आकृती तयार होईल तशीच आकृती लोकाची आहे. आकृती समजण्यासाठी उपमा अनेक आहेत. अधोलोकाचा आकार उलट्या वाडग्यासारखा आहे. तिर्यग लोकाचा आकार झालर किंवा पौर्णिमेच्या चद्रासारखा आहे. उर्ध्व लोकाचा आकार उर्ध्व मृदंगासारखा आहे. ४०८
iyana
n
Airintinumentarimummunicipa