________________
मस्तकावर तनुवात वलय सर्वथा कर्मरहित सम्यक्त्व इ. आठ गुणांनी युक्त सिद्ध स्थानात परमेष्टी अवस्थित आहेत. ते अविनाशी आहेत, अनंत आहेत.
हा लोक पाच प्रकारच्या एकेन्द्रिय जीवांनी सर्वत्र परिपूर्ण भरलेला आहे. परंतु त्रसजीव वसनाडीमध्येच असतात. त्याच्या बाहेर नसतात. पृथ्वीकाय, अपकाय, तेऊकाय, वायुकाय, वनस्पतीकाय, हे पाच प्रकारचे एकेन्द्रिय जीव आहेत. जे ३४३ रज्जू प्रमाण लोकात भरलेले आहेत. लोकाच्या मध्यभागी चौकोनी त्रसनाडी आहे. त्यातच बस जीव राहतात. वसनीडीच्या बाहेर असलेल्या पैकी कोणी एकेन्द्रिय जीव जर वसनामकर्मांचा बंध केलेला असल्यामुळे मृत्यूनंतर बसनाडीत जन्म घेऊ शकतो. कारण त्या जीवाचा त्रस नाम कर्माचा उदय झाल्यामुळे उपपातच्या दृष्टीने त्रस जीव त्रस नाडीच्या बाहेर असू शकतो.
. जेव्हा एखादा त्रसजीव त्रसनाडीच्या बाहेर, एकेन्द्रिय अवस्थेमध्ये जन्म घेण्याअगोदर मरणांतिक समुद्घात करतो तेव्हा त्रस अवस्थेमध्ये (पर्याय) असून सुद्धा त्याच्या आत्म्याचे प्रदेश त्रसनाडीच्या बाहेर असू शकतात. म्हणजे स्थूल पृथ्वीकायादी एकेन्द्रिय जीव आणि त्रसजीव सर्वलोकात नसतात. वृक्षाच्या सालीप्रमाणे लोकामध्ये बरोबर मध्यभागी एक रज्जू लांब एक रजू रुंद १३ रज्जू उंचीत थोडी कमी त्रसनाडी आहे. सातव्या नरकाच्या खाली एक रज्जूमध्ये निगोदाचे जीव राहतात. निगोद जैनदर्शदाच्या विशिष्ट पारिभाषिक शब्दापैकी आहे. त्याच्या उत्पत्ती संबंधी लिहिले आहे की "नीयतांगां भूमिं क्षेत्रं निवास अनन्तानन्त जीवानां ददाति इति निगोदम्" म्हणजे जो अनन्त जीवांना राहण्यासाठी क्षेत्र (जागा) देतो त्यास निगोद असे म्हणतात. "निगोद शरीरं येषां ते निगोद शरीरः'' निगोदच ज्यांचे शरीर आहे. तात्पर्य हे की, एकाच शरीरात अनन्त जीव राहतात. त्या एकाच शरीराच्या माध्यमाने ते स्पंदनशील होतात. ते निगोदी जीव आहेत.४१९ याप्रमाणे १४ रजूमध्ये एक रजू कमी असल्यामुळे १३ रज्जू बाकी राहतात. त्यातही सातव्या पृथ्वीच्या मध्यभागी नारकीचे जीव राहतात. खाली ३९९९ (तीन हजार नऊशे नव्यानो) योजन प्रमाण पृथ्वीमध्ये कोणताच त्रस जीव रहात नाही. उर्ध्वलोकात सर्वार्धसिद्धी विमानापर्यंतच त्रसजीव आहेत. त्यावरील क्षेत्रात कोणताच त्रसजीव नाही.
स्वामी कार्तिकेय लोकस्थित जीवाच्या भेद प्रभेदाचे वर्णन करताना लिहितात की स्थूलता व सूक्ष्मताच्या दृष्टीने जीव बादर आणि सूक्ष्म असे दोन प्रकारचे आहेत. बादर नामकर्मामुळे बादर पर्याया (अवस्था)त उत्पन्न जीवांना बादर म्हटले जाते. सूक्ष्म नामकर्माच्या उदयामुळे सूक्ष्म पर्यायात उत्पन्न जीवांना सूक्ष्म जीव म्हणतात. बादर जीवांना