________________
याने तम्ही तपश्चर्यद्वारा कर्म निर्जरच्या दिशेत उन्मुख व्हाल भावनेचे पुन्हा पुन्हा चिंतन अनुचिंतन मनात निश्चित परिवर्तन आणतात.४०४
अशा प्रकारे निर्जरा भावनेमध्ये निर्जरचे स्वरूप, लक्षण आणि तिच्या साधनावर पन्हा पुन्हा चिंतन मनन करीत राहिले पाहिजे. या चिंतनाने आत्म्यामध्ये तपाविषयी
आकर्षण वाढते, हृदयामध्ये तप करण्याची भावना जागृत होते. तप करण्याची शक्ती देखील अन्तरामध्ये जागृत होते आणि आत्मा जेव्हा त्या दिशेत अग्रेसर होतो तेव्हा कर्मावरणाला क्षीण करून परमविशुद्धीकडे अग्रेसर होतो.
लोक भावना
निर्जराभावने मध्ये कर्मक्षय होऊ लागले म्हणजे कर्मामुळे आत्मा चौदा राजुलोकामध्ये कुठे कुठे राहून आला आणि ह्या कर्म क्षेत्रातून आत्म्याला बाहेर काढून कर्मरहित आत्म्याचे राहण्याचे स्थान कोठे आहे त्याचे स्वरूप आपण लोकभावनेत पाहू. पूर्वी भावनामध्ये आत्म्याचा एकाकीपणा पर पदार्थाचा अन्यत्व भाव कर्मबंधांचे हेतू आणि कर्म निर्जरणाचे स्वरूप धर्माशिवाय आत्माचे अशरणत्व इ. विषयांचे विवेचन केले आहे. लोक स्वरूपाचे विशेष प्रकारे चित्रण केले जाईल. जीव, अजीव तत्त्व या लोकातच आहेत, जीवाचा, मानवाचा या विशाल लोकात कितीसे अस्तित्व आहे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या लोकांचे स्वरूप कसे आहे ? जीव-अजीवाच्या संदर्भात काय-काय घटित होते इ. विषयांचे ज्ञान मानवीय आत्मचेतनाला सत्यान्मुख होण्यास खूप सहायक सिद्ध होतात. आपल्या यथार्थ अस्तित्व बोधाने मानवाला यथार्थ पथावर अनुगमन करण्याची प्रेरणा प्राप्त होते. त्यामुळे हा आत्मा जड (निर्जीव) पदार्थापासून वेगळा आहे त्यावर कर्माची आवरणे आल्यामुळे आत्मा अविशुद्ध झाला आहे. आणि नेमके हेच काम करण्यास तो प्रेरित होतो. त्याला हे पक्के समजलेले असते की, आपले कल्याण, उत्थान, अभ्युदय आपल्याच पुरुषार्थावर अवलंबून आहे. अशी विचारशील व्यक्ती आपल्या आत्मपराक्रम आणि अध्यवसायद्वारे कर्मानवांना रोकण्यात समर्थ होतो. पुरातन संचित कर्मांचे निर्जरण किंवा क्षरण करण्यास उद्यत होतो. आत्मउपासनेचा मार्ग स्वीकार करण्याची प्रेरणा ह्याच्यात जागृत होते.
म्हणूनच लोकभावना एक स्वतंत्र भावना आहे. जैन आगमान तथा आगमोत्तर द्वादश भावनेच्या अंतर्गत यांचे मार्मिक विशेषण केलेले आहे. इथे त्याविषयी संक्षेपात
थोडा परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे.