________________
(१८८)
Revis
या तपाच्या साधनेने जीवनात निर्ममत्वता, निस्पृहता आणि अनासक्ती ब निर्भयतेची ज्योत प्रज्वलित होते.
सी. अशाप्रकारे जैनधर्मात तप म्हणजे फक्त काया-दण्ड रूप नव्हे, तर मानसिक शुद्धी सुद्धा होते. तप अध्यात्मसाधनेचा प्राण आहे.
संयमी पुरुष बाह्य व आभ्यंतर तप रूपी प्रज्वलित अग्नीमध्ये अत्यंत कठिणतापूर्वक निर्जरित होणाऱ्या कर्मांना क्षणात क्षय करून टाकतात.४०१
तप फक्त शरीर निर्बल करण्यासाठी नाही, ऋद्धि-सिद्धी प्राप्त करण्यासाठी नाही, परंतु आत्म्याला कर्मबंधनातून मुक्त करण्यासाठी तप आहे.
_ तप साधकाच्या जीवनात फार महत्त्वपूर्ण अंग आहे. परंतु तपसाधना करणे इतके सहज सोपे नाही. कारण जोपर्यंत साधकाची एषणा (इच्छा) समूळ नष्ट होत नाहीत जोपर्यंत तपाबरोबर ऐहिक, पारलौकिक सुख, यशकीर्तिची भावना असते. त्याने तपाची पवित्रता नष्ट होऊन जाते. आगमात म्हटले आहे की - "इहलोकातील सुखाची कामना आणि अभिलाषा करून तप करू नका. परलोकाची कामना ठेवून तप करू नका. यश, कीर्ती आणि प्रतिष्टा इ.साठी पण तप करू नका. तप करीत आहात तर फक्त कर्म निर्जरासाठी करा ४०२
___मनुष्य फार दुर्बल आहे. अनेक लोक खूप तप करतात. परंतु तपाच्या निमित्ताने प्रचंड आयोजन, आडम्बर करतात. अमर्यादित आरंभ-समारंभ करतात. याचे ही महत्त्व समजावताना म्हणतात हा ज्याचा त्याचा उत्साह आहे. अन्य सांसारिक कार्यक्रम समारंभ सोहळे आणि धुमधडाक्याने साजरे करतोच की हे तर धार्मिक कार्य आहे. धर्माची प्रभावना आहे. त्यात थोडा खर्च, आडम्बर केले तर काय हरकत आहे ? परंतु या समारंभाच्या देखाव्यात तपस्वीचे मन आनंदात गुरफटले, भारदस्त कार्यक्रम केला जाईल हा हेतू असेल तर महान तपाची पवित्रता नष्ट होईल. मग तपाचे महत्त्व शून्य होईल.
- निर्जराभावना अशा वैचारिक पृष्ठभूमीवर आधारित आहे. फक्त कर्म-निर्जरण कर्मोच्छेदासाठीच तप करावे असे आगमात प्रतिपादन केलेले आहे. बाकी सर्व साध्य झाले आणि निर्जरा साध्यशाली नाही तर मुक्तीचा मार्ग मिळणार नाही. कारण संचित कर्म विभाव उत्पन्न करीतच राहणार.
आचार्य शुभचन्द्र काव्यात्मक शैलीत वर्णन करताना म्हणतात - सुकृती- उत्तम आचारयुक्त पुण्यचरित पुरुष प्रथम अनशन इ. बाह्य तपाचे आचरण करतो. ततपश्चात
ammalnimammyanmmmmm