________________
(४९२)
जैन दार्शनिकांनी लोक संबंधी आपले मत प्रस्तुत करण्यासाठी चार अपेक्षा प्रस्तुत केल्या आहेत. १) द्रव्य, २) क्षेत्र ३) काल आणि ४) भाव,
द्रव्य अपेक्षेद्वारा त्यांनी ह्या लोकात कोणत्या वस्तू आहेत हे प्रकट केले आहे. क्षेत्र द्वारा त्यांनी या लोकाची लांबी-रुंदी उंची सांगितली आहे. काल द्वारा लोकगत द्रव्यांचा स्वभाव काय आहे ? आणि त्यात परिवर्तन कसे होते ? हे सांगितले आहे.
जैन दार्शनिकांनी द्रव्य अपेक्षेने सांगितले आहे की आकाश सगळ्यात मोठे द्रव्य आहे. ते असीम आहे. त्याच्या अगदी लहान क्षेत्रात धर्मास्तिकाय, अधर्मास्तिकाय, आणि जीव हे चार अस्तिकाय विद्यमान आहेत. त्याला (त्या आकाश समेत ) पुदगल लोक म्हणतात.
जैन धर्माच्या प्रवर्तकांच्या अनुसार आकाश, धर्म, अधर्म, जीव व पुदगल ᄒ पाच अस्तिकाय आहेत. कारण हे सर्व अगदी सूक्ष्म आहेत. अविभाज्य प्रदेशांची राशी रूप आहेत. गणनानुसार धर्मास्तिकाय, अधर्मास्तिकाय आणि आकाशास्तिकाय एक-एक अखण्ड द्रव्य आहे. पुद्गल आणि जीव संख्येत अनन्त आहेत.
क्षेत्राच्या दृष्टीने हा लोक असंख्य योजन लांब रुंद आणि उंच आहे. त्यात पृथ्वी, जल, अग्नी आणि वनस्पती अतिशय सीमित क्षेत्रात आहे. तसेच लोकाचा अधिकांश भाग मुख्यतः वायुपुरित आहे.
काळाच्या दृष्टीने ही पाचही द्रव्य अनादि म्हणजे कधी स्वतः उत्पन्न झाले नाही आणि नाही कोण्या ईश्वराने कोणत्या तत्त्वाने उत्पन्न केले आहे. ज्याप्रमाणे हा लोक आदिरहित आहे. त्याचप्रमाणे अंतरहित आहे. अर्थात हे कधी स्वतः नष्ट होणार नाही. अथवा कोणीही त्याला नष्ट ही करू शकणार नाहीत.
लोकाची सर्वथा नवीन उत्पत्ती आणि सर्वथा विनाश दोन्ही ही असंभव यामुळे आहे की जर सर्वथा नवीन उत्पत्ती होते असे मानले तर प्रश्न होतो की लोकाचे उपादान द्रव्य काय असेल? उपादानाशिवाय उत्पत्ती संभवच नाही.
भावच्या दृष्टीने गुण आणि पदार्थ दोन्ही ग्राह्य आहेत. पाच द्रव्यांचे गुण क्रमशः असे आहेत- धर्मास्तिकायचा गुण आहे गती करण्यात सहायता करणे. अधर्मास्तिकायचा गुण आहे स्थिर राहणाऱ्या जीवांना आणि पुदगलांना स्थितीमध्ये सहायता करणे, आकाशस्तिकाय स्थान (अवकाश) प्रदान करणे. जीवास्तिकायचा स्वभाव ज्ञान आणि