________________
(४८९)
तो ध्यान इ. आत्माधीन आभ्यंतर तपाचा अभ्यास करतो. या तपाद्वारे तो चिरकालापासून संचित कर्म ज्ञानावरणीय, दर्शनावरणीय, मोहनीय, आणि अंतराय या चार घाती कर्माचा क्षय करतो. नंतर परमानंदनिलय, अर्थात परमआनंदाचे गृह किंवा आवासस्थान ज्ञानरूपी समुद्रात प्रवेश करतो.४०३ तो ते दिव्य ज्ञान प्राप्त करतो. केवलज्ञान इ. अनंत चतुष्टय प्राप्त करतो,
ज्यांनी आसवाचा निरोध केला, जो तपाचरणाने युक्त आहे त्याचीच निर्जरा होऊ शकते. संचित कर्म निजीर्ण होऊ शकतात. निर्जराचे दोन रूप आहेत. १) देश (निर्जरा आणि २) सकल निर्जरा. संसारात संसरणशील प्राण्यांची क्षयोपशम प्राप्त कर्माची निर्जरा होतच राहते. ती देश (अंशमात्र) निर्जरा असते. कर्म काही अंशमात्र क्षीण होत राहतात. काही अंश उपशांत होतात. काही अंशात ते उदयास येतात, काही अंशात सत्तेमध्ये पडून राहतात. त्यांना क्षयोपशम म्हणतात.
सोन्याला अग्नीत जाळल्याने ते शुद्ध धातूरूपात निखरते. त्याचप्रमाणे तपाच्या आचरणाने कर्म जळून जातात. आत्मा निर्मल, शुद्ध होतो. तपरूपी अग्नी श्रेष्ठ ज्ञानरूप बाबूने, शील, उत्तम समाधीच्या आधाराने प्रज्वलित होते आणि भव बीजाला भस्म करते. ज्याप्रमाणे अग्नी तृण, काष्ठ इ. ना जाळून टाकते.
तप असे प्रभावी शस्त्र आहे की ज्यामुळे अनादिकाळापासून संचित असलेले कर्म नष्ट होऊन जातात. अंतरंग व बहिरंग तपाचरणात आपण स्वतःला झोकून द्यायला पाहिजे. निर्जराचा परिणाम इतका उच्च प्रकारचा आहे की, जीव, जन्म, वृद्धावस्था, मृत्यूच्या बंधनातून सुटून भवचक्रातून मुक्त होऊन अनंत सुखाला प्राप्त करू शकतो.
शरीरात जेव्हा विजातीय द्रव्य संचित होतात तेव्हा शरीर अस्वस्थ होतो. ते निघून गेले तर शरीर स्वस्थ होतो. त्याचप्रमाणे आत्मा विभावदशेत जातो तेव्हा अस्वस्थ होतो त्याला कर्म रोग लागू पडतो. परंतु जेव्हा स्वभावदशेत येतो तेव्हा स्वस्थ होतो. बाह्य कर्म संचयाची निर्जरा झाल्यावर मानसिक चंचलता समाप्त होते.
परंतु थोडी स्वस्थता लाभली तर लोक औषध घेणे विसरतात. तसेच थोडी शांती मिळाली की लोक धर्मानुष्ठान करणे विसरतात आणि संसारात काळोख उत्पन्न करणाऱ्या विषय भोगाचे पालन पोषण करू लागतात. त्यांना सोमदेवसूरी म्हणतात - हे जीवात्मा तुम्ही विसरू नका. पुन्हा अत्यधिक कष्टाने पीडित होऊ शकाल, तुम्ही चिंतन करा की पापाचे आचरण अती अप्रिय आहे, दुःखमय आहे मी तसे करणार नाही असे चिंतन