________________
भोगून नष्ट करायचे अशी 'निर्जरा' होते.३५?
तात्पर्य हे की, वैराग्यभावनाने आचरलेले तपच निर्जरानुप्रेक्षा आहे. निर्जगचे दोन प्रकार आहेत- सविपाक निर्जरा व अविपाक निर्जरा.
सविपाक निर्जरा स्वकाल प्राप्त निर्जरा होय. कारण परिवद्ध कर्म आपल्या अबाधाकाळापर्यंत सत्तेमध्ये राहतात. उदयकाळात उदित होतात आणि आपले फळ देऊन विकीर्ण होऊन जातात. आपल्या समयानुसार कर्म निर्जरा होत असल्यामुळे स्वकाल प्राप्त निर्जरा म्हटली जाते.
अविपाक निर्जरा तपाद्वारे घटित होते. जे कर्म उदित झाले नाहीत, त्या कर्माना तप बलाने मुद्दाम उदयास आणून निर्जीर्ण केले जाते.
जस-जशी साधूच्या जीवनात उपशम भाव आणि तपश्चरणाची वृद्धी होत जातेतस-तशी निर्जरा होत जाते. धर्मध्यान आणि शुक्ल ध्यान निर्जराचे विशेष कारण आहेत. खरं म्हणजे ध्यानामध्ये कर्म नष्ट करण्याची खूप मोठी शक्ती प्राप्त होते. व्यक्ती जसजसे प्रमाद, कषाय आदींचे वर्णन करीत जातो, ध्यान साधनेत अग्रसर होत जातो तसतसे कर्म निर्जराचे प्रमाण वाढत जाते. जो साधक कषायरूपी शत्रूवर विजय मिळवतो आणि इतर जनांकडून होणारे त्रास, दुर्वचन, तिरस्कार देवादीकडून होणारे उपसर्ग, कष्ट यांना सहिष्णुभावाने सहन करतो, त्याची अतिशय मोठ्याप्रमाणात निर्जरा होते.
जो साधक आपल्या आत्मस्वरूपात मग्न होतो, मन व इंद्रियांना वश करतो, आपली निंदा तथा गुणीजनांची सम्यक्त्ववती तथा ज्ञानीजनांची प्रशंसा करतो त्याची अत्यधिक निर्जरा होते. जितक्या प्रमाणात परम वीतरागताच्या दिशेने साधक वाटचाल करीत जातो त्या प्रमाणात त्याची परम निर्जरा होते.
निर्जरा होण्यासाठी तपाचरणाचा हेतू महत्त्वपूर्ण आहे. तपाचरण सम्यग्दर्शन व ज्ञानावर आधारित आहे. यांच्या शिवाय केलेले तप केवळ कायाक्लेश रूप आहे. सम्यग तपाने निर्जरा होते.
_ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला अजीर्ण झाले तर पोटात मळ साचून राहतो. मग तो माणूस जेवण करीत नाही पण असे औषध घेतो जेणेकरून अन्नपचन होईल. जठराग्नी तीव्र करतो. परिणामस्वरूप मळाचे निर्जरण होते. पोट हलके होते. तेव्हा कुठे त्याला हलके हलके वाटायला लागते.