________________
(४८२)
जैन दर्शनात विनयाला व्यापक स्वरूपात अतिशय महत्त्व ४) विनयतप दिले आहे. जीवनात प्रत्येक क्षेत्रात विनयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विनयाचा संबंध हृदयाशी येतो. विनय हा आत्मिक गुण आहे. ज्याचे हृदय कोमल असेल तोच तपाचे आचरण करू शकेल. विनय शब्द तीन अर्थाने प्रयुक्त केला आहे. आत्मसंयम ३७६ (सदाचार) ३.
2
१. विनय अनुशासन २७५ २. विनय विनय नम्रता आणि सद्व्यवहार
३७७
गुरू इत्यादी ज्येष्ठ मुनींचा, बयोवृद्धांचा, गुणवृद्धांचा यथोचित सत्कार सन्मान करणे विनय तप आहे. विनयाचे सात भेद आहेत. १) ज्ञान - विनय २) दर्शन - विनय ३) चारित्र - विनय ४) मन - विनय ५) वचन - विनय ६) काय-विनय ७) लोक व्यवहारविनय ३७८
• बिनय मुख्यतः मनाचा अहंकार आणि दुर्भाव दूर करणे यास म्हटले आहे. कारण मोक्ष प्राप्तीच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा अहंकार हाच आहे.
उत्तराध्ययन सूत्राच्या प्रथम अध्ययनात विनयाचे सुंदर विवेचन केलेले आहे. ज्ञान लाभ, आचार विशुद्धी आणि सम्यग् आराधना इ. ची सिद्धि विनयानेच होते. आणि शेवटी मोक्षाचे सुखसुद्धा विनय गुणामुळेच प्राप्त होते. चिनयाला यासाठीच तपाच्या श्रेणीत महत्त्वाचे स्थान दिले आहे. आणि विनयाचा संबंध हृदयाशी असल्यामुळे ते विशिष्ट प्रकारचे आंतरिक तप आहे. म्हणून विनयभावनेची सतत जोपासना करायला हवी. ३७९
वैय्यावच तप ( वैयावृत्य) - मनुष्य सामाजिक प्राणी आहे. तो समाजात राहतो. एक-दुसऱ्याच्या सहयोगाची अपेक्षा असते. सुख-दुःखात एकमेकांची मदत करतात. प्रसन्नता, संवेदना प्रकट करतात. तसे तर प्रत्येक प्राणीमात्राबद्दल परस्पर उपकाराची भावना असतेच. आचार्य उमास्वातींनी तर जीवाचे लक्षणच असे सांगितले आहे- "परस्परोपग्रहो जीवानाम्''३८० जीवात परस्पर एक दुसऱ्याची मदत करण्याची, सहकार्य करायची वृत्ती असते.
-
वैयावृत्य म्हणजे सेवा, सुश्रुषा, पर्युपासना, साधार्मिक- वात्सल्य इ. नावे आहेत. वैयावृव्य केल्याने आत्मा तीर्थंकर नाम - गोत्र कर्माचे अर्जन करू शकतो. ३८१
स्वाध्याय तप
शाखाचे अध्ययन करणे यास स्वाध्याय म्हणतात. तप म्हणजे फक्त शरीराला क्षीण करणे एवढेच नाही. परंतु तपाचा मूळ उद्देश्य आहे आंतरिक विकारांना क्षीण करून मन निर्मळ व स्थिर करणे.