________________
(८८१)
भगवती सूत्रात प्रतिसंलीनताचे चार प्रकारे वर्णन केले आहे. त्यात इंद्रिय पतिसंलीनता, कषायप्रतिसंलीनता, योगप्रतिसंलीनता, विवक्तशयनासन सेवना२७१ उत्तराध्ययन सूत्रात फक्त विवक्तशयनासनच घेतले आहे.३७२
वरील सहा प्रकारच्या बाह्य तपात प्रत्येक तपाचे फल संगत्याग, शरीरलाधव, विजय संयमरक्षण आणि कर्म निर्जरा आहे. अर्थात या तपांचे आचरण करण्याने शरीरातील मूर्छाभाव दूर होतो. आणि अंतर्बाह्य सर्व परिग्रहापासून अलिप्तता भाव निर्माण होतो. निर्ममत्व निरहंकार रूप प्रकट होते. असे तप केल्याने लघुभाव निर्माण होते. प्रत्येक कार्यात मग निर्दोषता येते. कर्माची निर्जरा तर होतेच होते.
। जैनधर्मातील तपविधी अशी आहे की त्याने बाह्य पासून अंतराकडे प्रगती होते. आपण आतापर्यंत बाद्य तपाविषयी विचार केला. आता अभ्यंतर तपाबद्दल माहिती प्राप्त करू या. अभ्यंतर तपाने मनाची शुद्धी होते. सरलता, एकाग्रताची विशेष साधना होते. हे तप बाह्य द्रव्याची अपेक्षा न ठेवता अंतःकरणाच्या व्यापाराने होतात. म्हणून त्यांना अभ्यंतर तप म्हटले आहे.
७) प्रायश्चित - व्रत घेतले पण प्रमादामुळे त्यात दोष लागले तर त्याची विशुद्धी करायला पाहिजे, ती विशुद्धी प्रायश्चित केल्याने होते.
व्रतामध्ये लागलेल्या दोषांची विशुद्धी योग्य प्रायश्चित घेऊन सम्यक् प्रकारे त्याचे निराकरण करणे म्हणजे प्रायश्चित.३७३
__प्रायश्चित तपाने हे सिद्ध झाले की प्रत्येक आत्मा आपल्या दोषांचे प्रक्षालन करू शकतो. त्यासाठी कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. फक्त हृदय शुद्ध ठेवण्याची आवश्यकता आहे. वैदिक ग्रंथात पापमुक्तीसाठी ईश्वराच्या शरणी जाऊन सर्व काही अर्पण करण्याचे विधान आहे. तर जैन धर्मात हृदय अत्यंत सरल ठेवून गुरुजनांच्यासमोर पाप प्रकट करून त्यासाठी तप साधना करण्याचे विधान आहे. कारण काही दोप फक्त पश्चाताप केल्यानेच नष्ट होऊ शकतात. काही दोष तप, सेवा इ. ने दूर होतात. या दृष्टीने प्रायश्चिताला तप मानले आहे. त्यास पापमुक्तीचा मार्ग म्हटले आहे.३७४ आपण केलेल्या व्रतभंगाचा उल्लेख करणे कठीण .
आहे. कारण मनुष्याचा अहंभाव इतका जागृत असतो की आपण आपले दोष आपल्या मुखाने कोणा समोर व्यक्त करणे हे सामान्य माणसाचे काम नव्हे. त्यासाठी ज्याचे हृदय पापभीरू आहे आणि स्वच्छ हृदय आहे इतर कषायांचे स्थान ज्याच्या हृदयात नसेल तोच प्रायश्चित करू शकतो. म्हणूनच प्रायश्चित एक आंतरिक महान तप आहे.