________________
(४८३)
स्वाध्याय शब्दाची व्युत्पत्ती करताना काही विद्वानांनी असे ही सांगितले आहे की-"स्वस्य स्वस्मिन् अध्यायः - अध्ययनं स्वाध्यायः'' आपण आपल्याच अंतःकरणात आत्मचिंतनात मननात निमग्न रहायचे म्हणजे स्वाध्याय.३८२ भगवान महावीर स्वामींनी आपल्या अन्तिम उपदेशात म्हटले आहे- “सज्झाए वा निउत्तेण सव्वदुःखविमोक्खणो"३८३
स्वाध्याय करीत राहिल्याने समस्त दुःखापासून मुक्ती मिळते. "सज्झाएणं नाण वरणिज्जं कम्मं खवेइ ३८४
स्वाध्याय केल्याने ज्ञानावरणीय कर्माचा क्षय होतो. स्वाधाय पाच प्रकारचे आहेत. वाचना- सत्साहित्याचे वाचन. पृच्छना - मनात शंका निर्माण झाल्यास गुरुजन किंवा ज्ञानीकडून शंका समाधान करून पुढे ज्ञानवृद्धी करणे.
परिवर्तना - जे ज्ञान मिळविले आहे, तोंडपाठ केलेले श्लोक तत्त्व इ.नी स्मृती रहावी विसरून जाऊ नये म्हणून वारंवार पुनरावृत्ती करणे म्हणजे परिवर्तना.
अनुप्रेक्षा - तत्त्वांचे अर्थ आणि रहस्यांवर विस्ताराने गंभीरतेने चिंतन करणे.
धर्मकथा - जे ज्ञान मिळवले, त्याचे चिंतन मनन केलेले ज्ञान, लोककल्याणाच्या भावनेने दुसऱ्यांना समजावून सांगणे. अशाप्रकारे स्वाध्यायचे पाच प्रकार सांगितले आहेत. यांच्या आधाराने साधकाने आपले जीवन जास्तीत जास्त स्वाध्याय, तप करून दिव्यज्ञानाचा प्रकाश मिळवून निर्जरा करावी.
ध्यान-तप - उत्तराध्ययन सूत्रात आभ्यंतरतपाचे जे भेद सांगितले त्यात "ध्यान" हे पाचवे तप म्हणून सांगितले आहे. तत्त्वार्थ व योगशास्त्रात सहावा अंतिम भेद - म्हटले आहे. तेथे पाचवा व्युत्सर्ग (कायोत्सर्ग) भेद घेतला आहे. आपण उत्तराध्ययन सूत्रानुसार ध्यानाला पाचवा भेद मानून विवेचन करणार आहोत.
उत्तम संहनन म्हणजे शारीरिक बांधा मजबूत असणाऱ्याच्या अन्तःकरणाच्या वृत्तीची स्थापना ध्यान आहे. त्याची समय मर्यादा ४८ मिनिटे असते. (मुहुर्त-४८ मिनिट) व्यानाचे चार प्रकार आहेत- १) आर्तध्यान २) रौद्रध्यान ३) धर्मध्यान ४) शुक्लध्यान शेवटचे दोन ध्यान मोक्षाचे कारण आहेत.३८५
आर्तध्यान - १. अनिष्ट वस्तुंचा संयोग २. इष्ट वस्तूंचा वियोग ३. प्रतिकूल अदना आणि ४. भोगाची लालसा या आधारावर आर्तध्यानाचे चार प्रकार आहेत.२८५
त्याची चार लक्षणे आहेत. १. क्रन्दनता, २. शोचनता, ३. तिप्पणता, ४. परिवेदना ३८७