________________
(४८४)
१. क्रन्दनता - रडणे, विलाप करणे, ओरडणे. २. शोचनता - शोक करणे, चिंता करणे. ३. तिप्पणता - अश्रू ढाळणे. ४. परिवेदना - हृदयावर परिणाम होईल इतके दुःख करणे. ही चार लक्षणे अत्यंत दुःखित व व्यथित अवस्थेचे सूचक आहेत.
सम्राट चक्रवर्तीची राणी श्रीदेवी चक्रवर्तीच्या मृत्यूनंतर सहा महिनेपर्यंत सतत रडते शोक करते. आर्तध्यानाचा असा परिणाम होतो की श्रीदेवी मृत्यूनंतर सहाव्या नरकात जाते.३८८ असे ध्यान अशुभ मानले गेले आहे.
रौद्रध्यान - याचे चिंतन क्रूर आणि कठोर असते. हिंसा, खोटेपणा. चोरी. विषयांच्या रक्षणासाठी सतत चिंतित राहणे. रौद्रध्यान अविरत आणि देशविरतमध्ये संभव आहे.३८९ संचमी व्यक्ती कधी रौद्रध्यान करीत नाही. कारण रौद्र भावनेत संयमी जीवन राहूच शकत नाही.
रौद्रध्यानाचे चार लक्षण आहेत -
१) ओसन्नदोसे - हिंसाचार, खोटे बोलणे, इ. पाप कर्मांचा अत्यंत आसक्तीपूर्वक विचार करणे.
२) बहुलदोसे - भिन्न-भिन्न प्रकारच्या पापी दुष्ट विचारात मग्न राहणे. ३) अण्णाणदोसे - अज्ञानतेमुळे, हिंसादी अधर्म कार्यात मग्न राहणे.
४) आमरणांतदोसे - स्वतः केलेल्या पापाचरणाचा पश्चाताप न करता, मृत्यूपर्यंत क्रूरता, द्वेष करीत राहणे.३९०
जैनशाखात 'तन्दुलमत्स्य'चे वर्णन रौद्रध्यानासाठी उदा. म्हणून दिले आहे. तन्दुलमत्स्य रौद्रध्यान केल्यामुळे मरून सातव्या नरकात जातो. तिथे अनंत वेदना भोगतो. रौद्रध्यानाचा हा असा दुप्परिणाम आहे.
हे ध्यान जरी चार प्रकारचे आहेत. परंतु या दोन ध्यानाचा तपात समावेश होत नाही. त्याने निर्जरा तर शक्यच नाही. तपाच्या श्रेणीत फक्त दोन ध्यान येतात. धर्मध्यान आणि शुक्लध्यान-आर्तध्यान आणि रौद्रध्यान यांना केवळ 'ध्यान' म्हटले आहे की त्या अशुभ चिंतनात सुद्धा एकाग्रता असेलच. तरी ही एकाग्रता आहे अशुभच. याने आत्म्याचे
शत. म्हणूनच भ. महावीरांनी यांना अग्राह्य म्हटले आहे. अनाचरणीय म्हटले आहे.