________________
(४) भाव उणोदरी
भिक्षेच्या वेळी अभिग्रह इ. करणे.
५) पर्याय उणोदरी - वरील चार भेदांचे आचरण करीत राहणे. ३६५ याप्रमाणे उणोदरी तपाच्या भेदांचे सतत चिंतन करणे, भावना करीत राहणे याने निर्जरा होते.
या तपाने संयमात जागरुकता राहते. दोष शमतात. संतोष, समाधान, स्वाध्याय सुख इ.ची प्राप्ती होते.
३) भिक्षाचरी तप (वृत्ति परिसंख्यान) आशा, तृष्णाच्या निवृत्तीसाठी भिक्षेच्या वेळी साधू एक, दोन किंवा तीन घरातून भिक्षा घेऊन असा नियम करणे यास वृत्तिपरिसंख्यान तप म्हटले आहे. १६६ भिक्षा याचा शाब्दिक अर्थ याचना किंवा मागणे असा आहे. या तपात साधक आपल्या इच्छांचा निग्रह करतो. जे मिळेल त्यातच समाधान मानणे.
(४८०)
४) रसपरित्याग
जितेन्द्रियत्व, तेजोवृद्धी आणि संयम बाधा निवृत्तीसाठी तूप, दही, गुळ आणि तेल इ. चा त्याग करणे म्हणजे रसपरित्याग आहे. २६७ यात स्वाद घेण्यावर विजय मिळवण्याची साधना आहे. ब्रह्मचर्याची साधना करण्यासाठी 'रसत्याग' तप अती आवश्यक आहे.
-
—
५) कायक्लेश शरीराला कष्ट देणे उत्तराध्ययन आणि योगशाखात कायक्लेश तपाचा पाचवा नंबर आहे. तत्त्वार्थसूत्रात हे सहावा बाह्य तप आहे.
कायक्लेश तपामध्ये अनेक प्रकारचे प्रतिमायोग धारण करणे, मौन राहणे, आतापना घेणे, वृक्षाखाली निवास करणे, इ. प्रकाराने शरीरपरिवेद करणे, शरीराला कष्ट देणे कायक्लेश आहे. या प्रकाराने अचानक दुःख आले तर सहनशक्ती प्राप्त होते. ३६८
६) प्रतिसंलीनता याला तत्त्वार्थवार्तिकमध्ये विविक्तशयनासन म्हटले आहे. बाधानिवारण, ब्रह्मचर्य, स्वाध्याय आणि ध्यान इ. साठी निर्जन्तुक शून्यगार, गिरीगुफा इ. एकान्त स्थानात बसणे झोपणे इ. विवक्त शयनासन आहे. ३६९
प्रतिसंलीनताचा अर्थ आहे आत्म्यामध्ये तीन होणे. परभावापासून आत्म्याला दूर करून स्वभावात लीन करणे, इंद्रिय, कषाय, मन, वचन आणि काययोग यांना रूपाने दूर करून आत्म्यात लीन करणे, प्रतिसंलीनता तप आहे. या दृष्टीने प्रतिसंलीनता संयम सुद्धा म्हणू शकतो. ३७०