________________
(४७८)
अशाच प्रकारे मिथ्यात्व राग व अज्ञानामुळे कर्मरूपी मळाचा संचय होतो. ने ध्यानरूपी अग्नीने नष्ट होते. निर्जीर्ण, क्षीण होते.३५३ अशाप्रकारे निर्जरा भावना मजन घेऊन भावित व्हायला पाहिजे. अशा चिंतनाने मनन केल्याने, अभ्यास केल्याने कर्माचा नायनाट होतो.
आचार्य हेमचन्द्रांनी निर्जराचे विवेचन करताना तपाच्या बारा प्रकारांचा नामोल्लेख केला आहे. त्यात सहा बाह्य तप व सहा अभ्यंतर तप आहेत. बाह्य तपाचे सहा भेद - १) अनशन २) उणोदरी ३) वृत्तीसंक्षेप ४) रसपरित्याग ५) कायक्लेश ६) लीनता (प्रतिसंलिनता) अभ्यंतर तपाचे सहा प्रकार - १) प्रायश्चित २) वैयावृत्य ३) स्वाध्याय ४) विनय ५) व्युत्सर्ग ६) ध्यान३५४
- वरील बारा तपांचे विस्तृत रूपाने उत्तराध्ययन सूत्रात विवेचन केलेले आहे. वरीलप्रमाणेच बारा तपांची नावे आहेत. फक्त क्रमात फरक आहे. अभ्यंतर तपाच्या क्रमात थोडा बदल आहे. १) प्रायश्चित २) विनय ३) वैयावच्च (वैयावृत्य) ४) स्वाध्याय ५) ध्यान ६) व्युत्सर्ग अशाप्रकारे घेतले आहे.३५५
भगवती सूत्र व तत्त्वार्थ सूत्रात तपाचा असाच क्रम आहे.३५६
तपाच्या बारा भेदांचे इतके विस्तृत विवेचन जैनागमात तथा आगमोत्तर ग्रंथात प्राप्त होते की फक्त 'तप' विषय घेऊनही शोधार्थी आपला शोध ग्रंथ लिहू शकतो. मरुधर केसरी प्रवर्तक पू. श्रीमिश्रीमलजी म. नी "जैनधर्म में तप स्वरूप और विश्लेषण' या पुस्तकात तपाचे विवेचन केले आहे. अतिशय सुंदर सार्वदेशिक विवेचन केले आहे.
__ इथे निर्जरा भावनामध्ये तपाच्या बारा भेदांचे संक्षिप्त फक्त परिचय करून दिला जाणार आहे. कारण आपला मुख्य विषय 'भावना' आहे. भावनामध्ये अनशनादी तप कशाप्रकारचे असतात हे ही समजणे आवश्यक असते.
१) अनशन - उपवास (कवल आहार करायचा नाही)
संयमित जीवन जगण्यासाठी, कर्मांची निर्जरा करण्याच्या हेतूने आहाराचा परित्याग केला जातो ते 'अनशन' तप होय.३५७
संयम प्रसिद्धी, रागोच्छेद, कर्मविनाश, ध्यान आणि आगमबोध इ. साठी अनशन आवश्यक आहे.३५८
अनशन दोन प्रकारचे - १ इत्वरिक २. मरणकाल. इत्वरिक- सावकांक्ष आह.