________________
(४७५)
दोन उदाहरणे दिली आहेत. ज्याप्रमाणे झाडाला येणारी फळे आपल्या वेळेवरच पिकतात. पण विशिष्ट प्रक्रियेने फळे लवकर पण पिकवली जाऊ शकतात. त्याचप्रमाणे पूर्ववद्ध कर्मसुद्धा आपली स्थिती पूर्ण झाल्यावर फळ देतात आणि काही कर्माना तप करून स्थिती पूर्ण होण्यापूर्वीच फळ देऊन नष्ट केली जाऊ शकतात.
सविपाक निर्जरा तर सर्व जीवांची सतत होतच असते. तप करा किंवा नका करू सम्यग्दृष्टी असो किंवा नसो, कर्म जेव्हा जीवाच्या उदयावलीत प्रवेश करतात तेव्हा फळ देणाऱ्या कर्माची निर्जरा होते. कारण सर्व जीव सतत कर्म करीतच असतात. आणि त्यांची फळे भोगतच असतात. पण अशाप्रकारे तर सविपाक निर्जरा फार थोड्या कर्माची होते. सर्व कर्माची निर्जरा होत नाही. कारण सर्व कर्मांची स्थिती वेगवेगळी असते. शिवाय सर्वांचे सहकारी तत्त्व द्रव्य, क्षेत्र, काल, भाव सुद्धा एकाच वेळी जमून येत नाही. म्हणून सर्व एकदम उदयास येत नाहीत. ज्या कर्माचा उदयकाळ असेल तेच कर्म उदयास येतात. तेवढ्याचीच निर्जरा होते. बाकीच्यांची निर्जरा होत नाही. परंतु ते उदयास न आलेले जे कर्म आत्म्यात तसेच चिकटून आहेत. त्यांना उदयाच्या स्थितीत येण्याअगोदर तपश्चर्यांच्या अनेक प्रकाराने उदयास आणून सर्व कर्माची निर्जरा करू शकतो. ३४७
पुढे ग्रंथकार एका शंकेचे समाधान करतात की, आगमामध्ये जागजागी म्हटले आहे - कडाण कम्माण ण मुक्ख अत्थि ३४८ म्हणजे केलेले कर्म भोगल्याशिवाय सुटका होत नाही. आणि असे ही म्हटले आहे की, "भवकोदि संधियं कम्मं तवसाणिज्जरिज्जइ"३४९ अर्थात करोडो भवातील संचित कर्म तपाद्वारे निर्जरित होतात. या दोन्ही गोष्टीत विरोधाभास वाटतो. याचे समाधान करताना म्हटले आहे- तपाच्या अग्नीत कर्माचा विनाश होतो, ज्यांनी अजून फळ दिले नाही. ज्याप्रमाणे आगीत घास-फूस जळून खाक होते, किंवा कापूलाला काडी लावताच क्षणार्धात जळून नाक होते. अगदी तसेच तपरूपी अग्नीने महान कर्म तृणाप्रमाणे जळून नष्ट होऊन जातात.
जळून २
ज्ञान, दर्शन, चारित्र्यने युक्त असलेले तपकर्म पुद्गलातील स्नेह परिणामांना शुष्क करून टाकतात. म्हणून कर्मात असलेले स्नेह परिणामाचा विनाश झाल्यावर स्निग्धता राहते. धुळीप्रमाणे कर्म नष्ट होऊन जातात. एखाद्या वस्तूत चिकटपणा असला तर ते एकमेकांना चिकटलेले असतात. चिकटपणा गेला की ते दोन्ही वेगवेगळे होतात. त्याचप्रमाणे काय इ.च्या स्नेहामुळे जे कर्म पुद्गल जीवाशी एकरूप झाले होते, तप केल्याने कपायाची स्निग्धता दूर झाल्याने ते जीवापासून पृथक होतात. तरीही संवर करून प्रथम येणाऱ्या