________________
(४७४)
ह्याच्यात अस्तित्व राहते. श्री जिनभद्रगणि क्षमाक्षमण यांनी सुद्धा संवर आणि निर्जरा यांना मोक्षाचा मार्ग असे सांगितले आहे. ३४५
निर्जरचे दोन भेद आहेत. कर्म उदयावस्थेत येऊन परिपक्क होऊन आपले फळ देऊन जीर्ण होऊन जातात. ही प्रथम प्रकारची निर्जरा. ही सर्व जीवांची होते. उदा. झाडे, रोपटे इ. भयंकर सर्दी, गर्मी वगैरे सहन करतात. हे असे उदयास आलेले कर्म सहन केल्याने आपला प्रभाव दाखवून संपतात. ही सहज करण्याची क्रिया झाडांची सहज झाली. त्यासाठी त्यांनी कोणताही प्रयत्न केलेला नाही. आपोआप होत राहिली. याला आगमात अकाम निर्जरा असे म्हटले आहे.
दुसऱ्या प्रकारची निर्जरा ज्यात तप करून कर्मांना आत्मबलपूर्वक उदयास आणून जीर्ण करणे. व्रताने ही निर्जरा केली जाते. यास सकाम निर्जरा म्हणतात.
पहिल्या प्रकारची अकाम निर्जरा चारही गतीच्या जीवांची होते. दुसऱ्या प्रकारची निर्जरा त्यांचीच होते ज्यांचे जीवन सर्वविरतीमय अथवा देशविरतीमय असते. अर्थात महाव्रती किंवा अणुव्रती यांची होते.
आचार्य उमास्वाती यांनी निर्जरा आणि विपाक या तीनही शब्दांना एकार्थवाची म्हटले आहे. त्यांनी निर्जराचे अबुद्धिपूर्वक व कुशलमूल असे दोन भेद केले आहेत. नरक इ. गतीमध्ये कर्माचे फलविपाक बुद्धिप्रयोगशिवाय होत असतात त्यास अबुद्धिपूर्वक निर्जरा म्हणतात. या निर्जराबद्दल जीवाला कुशलानुबंध होत नाही. तप केल्याने तसेच परिषहांना जिंकल्यामुळे जी निर्जरा होते ती कुशलमूल निर्जरा असते. या निर्जराच्या गुणवत्तेसंबंधी पुन्हापुन्हा विचार करायला पाहिजे. अथवा ह्याच्या शुभानुबंधता किंवा निरानुबन्धतेचे पण चिंतन केले पाहिजे. असा विचार करणारा मुमुक्षू कर्माची निर्जरा करण्याच्या प्रयत्नात असतो ३४६
वरील दोन्ही प्रकारात फक्त नावात फरक आहे. भावार्थ वारसाणुवेक्खामध्ये वर्णित निर्जराच्या भेदाप्रमाणेच आहे.
संचित कर्मांची निर्जरा करण्यासाठी आचार्य शिवार्य उदाहरणाद्वारे समजावताना म्हणतात. ज्याप्रमाणे सुरक्षित धनाचा उपयोग घेतला नाही तर ते कमी होत नाही. त्याचप्रमाणे तपाशिवाय फक्त संवराने कर्मक्षय होत नाही. कर्माचा क्षय करण्यासाठी तप करायला पाहिजे. पूर्वी बद्ध केलेल्या कर्माचा क्रमशः क्षय करण्याच्या प्रक्रियेला निर्जरा म्हणतात. इथे निर्जरचे दोन भेद केले गेले आहेत- सविपाक व अविपाक हे समजण्यासाठी