________________
भगवानांनी म्हटले आहे. ती अणुव्रते बारा प्रकारची आहेत, जे श्रावक धारण करतात.
अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच महावते आहेत. महावत सर्वथा पापक्रियांपासून परावृत्त करतात. अणुव्रतामध्ये एक देश (अंशतः) पापक्रिया पासून परावृत्त होऊ शकतात. आणि एक देश (अंशतः) ने पाप क्रिया चालू राहते. गृहस्थाश्रमात राहत असताना पूर्णपणे पापक्रिया पासून अलिप्त राहणे अशक्य आहे. म्हणून अणुव्रतांद्वारे त्यात थोडी सूट दिली आहे. कित्येक पापक्रिया अशा आहेत की आपण करीत नाही. परंत जोपर्यंत प्रत्याख्यान-नियम करीत नाही तोपर्यंत सूक्ष्म रूपात पापकर्म आपल्याकडे येतच असतात. म्हणून नियमव्रताच्या बंधनात आपल्याला आपण बांधून घेतले तर पापक्रिया येण्याचे थांबतात. म्हणून ज्याच्याशिवाय आपले काम चालू शकते तशा प्रत्येक पापक्रियांचा निरोध करण्यासाठी व्रत धारण करायला पाहिजे.
जसे अहिंसा इ. पाच महाव्रते आहेत तशीच अणुव्रते १२ आहेत. अहिंसादी पाच व्रते, दिशाव्रत, भोगोपभोग व्रत, अनर्थ दण्ड विरमण, सामायिक व्रत, दिशावकाशिव्रत, पौषधव्रत, अतिथि संविभागवत.
- आस्रव भावनेत जे अव्रत आहेत खरे म्हणजे त्यांनाच व्रतात घ्यायला हवे होते. परंतु श्रीरत्नचन्द्रजी महाराजांनी इथे ते व्रत न घेता १२ अणुव्रत घेतले आहेत. तसे पाहिले तर पाच इंद्रिय, सहावे मन आणि सहा काय असे हे बारा अव्रत त्यांनी सांगितले आहेत. ह्यांचा अहिंसाव्रतात समावेश होतो. म्हणून कदाचित श्रीरत्नचंद्रजी म. नी समग्ररूपाने व्रतांचे पालन करण्यासाठी बारा अणुव्रतांचे प्रतिपादन केले आहे.
। संवराचा तिसरा भेद अप्रमाद - याचे वर्णन करताना ते लिहितात की वृद्धावस्थेत शरीर दुर्बल होते. रोग झालाच तर शरीर झिजायला लागते. लोभ केल्यामुळे ज्याप्रमाणे कीर्तीचा नाश होतो, तसेच प्रमाद केल्यामुळे मानसिक व आत्मिक गुणांचा नाश होतो. म्हणून गुण-संपत्ती आणि सुख-संपत्तीची अभिलाषा ठेवणाऱ्यांनी अप्रमादी राहून शुभ पुरुषार्थ करायला पाहिजे.३२५
अप्रमादचा क्रम व्रतांच्या नंतर येतो. व्रत घेऊन पापक्रिया थांबविण्याचे सामर्थ्य प्राप्त केले. परंतु त्यांचे पालन करताना किंचित मात्र शिथिलता केली तर कर्माग्नव थांबवणे कठाण होईल. ज्याप्रमाणे औषधाने रोग तर दर झाला परंतु वैद्याने जे पथ्य सांगितले होते त्याचे पालन केले नाही तर रोग परत उद्भवण्याची शक्यता आहे. कारण पथ्य पाळण्यात अमाद केला. हीच गोष्ट कर्मरोगावर लाग होते. सम्यकश्रद्धा व व्रतरूपी औषधीने कर्मरोग