________________
(४६६ )
दूर झाला खरा. परंतु त्यानंतर सम्यकप्रकारे प्रवृत्ती केली नाही तर कर्मरोगाचे परमाणू नष्ट होऊ शकणार नाहीत. प्रमाद रोग अप्रमादाने दूर होऊ शकतो. अप्रमादाचे महत्त्व भावनाशतकामध्ये असे सांगितले आहे - एखाद्या माणसाला ताप आला आणि तो उतरला की त्याला काही खाण्याची इच्छा होते, पोटात चिकलेला मैला साफ झाला की पोटातील पीडा शांत होते. त्याचप्रमाणे जेव्हा प्रमाद दूर होतो तेव्हा मानसिक व आत्मिकगुण उत्पन्न होतात. आणि जसजसे गुण उत्पन्न होत जातात तसतसे दोषांचा विलय होत जातो. आणि त्याबरोबरच मन आणि आत्म्याची दुर्बलता दूर होते. २२६
संवराचा चतुर्थ भेद अकषाय क्रोध, मान, माया लोभ यांचे अंनतानुबंधी इ. भेदांचे १६ भेद आणि ९ कषाय असे २५ कपायांचे वर्णन आस्रवभावनामध्ये केले गेले आहे. अकषायमध्ये असे चिंतन करायचे आहे की या कषाय चांडाळापासून मी कधी मुक्त होईन, ज्या क्षणी या कपायांचा संग सुटेल तो क्षण खऱ्या सुखाचा क्षण होईल, ३२७
संवराचा पाचवा भेद अशुभ योगाचा त्याग आहे
मनाने कोणाचे वाईट
1
करू नये. दुष्ट इच्छा करू नये. कोणाचीही ईर्ष्या करू नये किंवा वैर ठेवू नये, असे केले तर हे मानसिक अशुभ योग आहेत, वाचिक अशुभ योगात व्यक्ती कोणाचीही निंदा करते. शिव्या देते, खोटा आरोप ठेवते, किंवा असत्य भाषण करते. कायिक अशुभ योगात व्यक्ती कोणाच्या हक्काची वस्तु हिसकावून घेते. चोरी करते. व्यभिचार कर्माचे सेवन करते. विषयांची आसक्तीमध्ये इंद्रियांचा उपयोग करते. या सर्व अशुभ प्रवृत्ती धार्मिक व आत्मिक शक्तींचा विनाश करतात. म्हणून अशुभ प्रवृत्तींना रोकण्यासाठी आत्मिक शक्ती प्रकट करून शुभ धर्माचा आश्रय घेण्याने संवर होतो. व संवरामुळे मुक्तीचा मार्ग मिळतो ३२८
-
पंडित श्रीरत्नचंद्रजींनी आस्रव व संवराचे मुख्य पाच भेद मुख्य पायाच्या रूपात ठेवून विश्लेषण केले आहे. त्यामुळे साधक सहजतेने समजू शकतात. मिथ्यात्व अव्रत, प्रमाद, कषाय आणि अशुभ योग द्वारा कर्मास्रवाचे आगमन आणि समकित व्रत, अप्रमाद, • अपाय व शुभ योगाने कर्मासवचा निरोध सांगून जैन दर्शनाच्या गहन विषयाचे सोप्या भाषेत प्रतिपादन केले आहे ही त्यांची एक विशेष शैली आहे.
श्रीजयसीममुनी दोहा छंदाद्वारे संबर भावनामध्ये मन एकाग्र करण्याची प्रक्रिया सांगताना म्हणतात- आपल्या शुभ मनाला मानसरोबर मानून त्यात शुभ ध्यानरूपी अमृतरस