________________
ते सतत चिंतन करावे की चुकूनही आस्रवद्वार थोडेसेही उघडे तर राहिले नाही ना ! या विषयी थोडासुद्धा निष्काळजीपणा केला तर भवसागरात बुडवून टाकतात. जर तशी दक्षता देवली तर स्वतः संसारसागर तरून जातात व आपल्या सत्संगात येणाऱ्या भवी जीवांना भवपार करतात. याविषयी एक दृष्टांत आहे- श्रीवजस्वामी कंचन, कामिनीचे त्यागी पूर्ण वैरागी होते. एक श्रीमंत सेठ होता. त्याची मुलगी रुक्मिणी अत्यंत रूपवान होती. एकदा वजस्वामींचा सदुपदेश ऐकून ती त्यांच्यावर मोहित झाली. घरी आल्यावर आपल्या आईबडिलांनी म्हणाली. मी लग्न करीन तर वज्रस्वामीशीच करीन, अन्य कुणाशीही लग्न करणार नाही. आई-वडिलांना तिला खूप समजावून सांगितले. मुनीराज कधी विवाह करीत नाहीत. परंतु ती ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी तिचे वडील सेठ धनवाह खूप संपत्ती घेऊन व रूपवान कन्या रुक्मिणीला वज्रस्वामीकडे घेऊन गेले. आणि मुनींना सांगितले. माझ्या मुलीशी लग्न करा आणि या धनसंपत्तीचा खूप उपभोग घ्या. इतके सांगून ते घरी निघून आले.
यौवनात पदार्पण केलेल्या अतिरूपवान सुंदरी रुक्खिमीणीने अनेक प्रकाराने भोग उपभोगाच्या सुखाचे त्यांच्या समोर वर्णन केले. हावभावाने त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. वज्रस्वामी मेरुपर्वतासारखे अचल अटल राहिले. अशी अतिदृढता पाहून रुक्खिमीणीला स्वतःलाच बोध प्राप्त झाला. आणि तिने निश्चय केला की, या अती महापवित्र साधूला डिगवणे असंभव आहे. रुक्खिमणीला तिच्या वडलांकडून जी संपत्ती मिळाली होती ती सर्व शुभ क्षेत्रात दान करून चारित्र्य ग्रहण केले आणि आत्मसाधना करून जीवनसार्थक केले.३४२
यास ज्ञानी संवर म्हणतात. असाच संवराचा दृष्टांत उत्तराध्ययन सूत्राच्या बाराव्या अध्ययनात हरिकेशी मुनीसंबंधी आहे. ज्याप्रमाणे कासव आपल्या सर्व इंद्रियांना आत ओढून घेतो तेव्हा त्याला बाहेरून कोणताही धोका नसतो. त्याचप्रमाणे साधक जेव्हा साधनेत रमतो, त्यावेळेस आपल्या पाप क्रियांना पापानवांणा, कर्मानवांना रोकण्यासाठी सवर भावनेने संवृत्त व्हावयास पाहिजे. संवर भावना आत्मशुद्धीचा उत्तम मार्ग आहे. चालत्या रेल्वेला थांबवण्यासाठी लाल झेंडा दाखवला जातो त्याचप्रमाणे पापाला राकण्यासाठी संवर भावना लाल झेंडा आहे. साऱ्या धर्मा आराधनाचे अनुष्ठान संवर भावनेत मानले जातात.
वरील संपूर्ण संवर भावनेचे विवेचन करताना कित्येक लेखक व कवींनी संवर भावनेचे चिंतन करण्याचे दोन प्रकार सांगितले आहेत. एका प्रकारात संवराचे भेद प्रभेदांना