________________
ctGORIA
a
मिथ्यात्वद्वाराचा अवरोध उपशम, क्षयोपक्षम अथवा क्षयरूपाने होतो. त्याच्या भेदावरोवर समकितचे ही भेद केले गेले आहेत.
१) उपशम समकित - मिथ्यात्व मोहनीयचा अवरोध उपशम, रूप असेल तर त्यामुळे प्रकट होणारे समकित असते त्यास उपशम समकित म्हणतात.
२) क्षयोपशम समकित - मिथ्यात्व मोहनीयचा थोडा क्षय आणि थोडाउपशम क्षयोपशम रूप असतो त्या समकितचे नाव क्षयोपक्षम समकित आहे.
३) क्षायिक समकित - मिथ्यात्व मोहनीय प्रकृतीचा सर्वथा क्षय झाल्यामुळे जे समकित प्राप्त होते त्यास क्षायिक समकित म्हणतात.
४) सास्वादान समकित - समकित गेले आणि मिथ्यात्वमध्ये जाणार त्यामधल्या काळात समकितचा थोडा आस्वाद राहतो. या पतित अवस्थेला सास्वादान समकित म्हणतात.
५) वेदक समकित - मिथ्यात्व मोहनीयचा सर्वथा क्षय करण्याच्या अंतिम स्थितीला वेदक समकित म्हणतात. एक समयानंतर लगेच क्षायिक समकित प्रकट होते.
वरील पाच समकितांपैकी प्रथम तीन समकित मुख्य आहेत. तीन पैकी कोणतेही एक समकिताचे आस्तित्व आत्मोत्थानसाठी अती आवश्यक आहे.
सम्यग्दृष्टी बाहेरून प्राप्त होत नाही. ही तर आन्तरिक भावनेतून प्रकट होते.
सम्यग्दृष्टी जीव गृहस्थावस्थेत राहतो. प्रत्येक सांसारिक व्यवहार व्यवस्थित करतो. परंतु सम्यगदृष्टी असलेल्या जीवाची अंतरदशा अशी असते
सम्यग्दृष्टी जीवडो करे कुटुम्ब प्रतिपाल ।
अंतर से न्यारो रहे, ज्यो धाय खिलावे बाल ।। - अशा अवस्थेत सांसारिक दुःख आत्म्याला स्पर्श करीत नाहीत. यामुळे अन्तःकरण प्रफुल्लित राहून धर्मात नेहमी मग्न राहतो.
। संवराचा दुसरा भेद विरतीव्रत आहे. ज्याप्रमाणे औषध घेतल्याशिवाय रोग बरा हात नाही. जेवल्याशिवाय भूक भागत नाही. पाणी प्यायल्याशिवाय तहान शमत नाही. त्याचप्रमाणे विरतीव्रताशिवाय कर्मरूपी रोगजंतु येण्याचे बंद होत नाहीत.३२४
महाव्रत आणि अणुव्रत हे व्रतांचे दोन प्रकार आहेत. महाव्रतांपेक्षा लहान व्रतांना अणुव्रत म्हणतात. छोटे-छोटे अणुव्रतसुद्धा पाप प्रवाहाला अडवतात, असे जिनेश्वर
ant
SARS75
EPS