________________
मिथ्यात्वाच्या निरोधासाठी सम्यक्त्व इ.चा अन्य लेखकाप्रमाणेच वर्णन केले आहे. आणि पटे लिहिले आहे अशुभ लेश्या, संज्ञा आणि अशुभ गौरवाच्या त्यागाने तथा शुद्ध भावना ठेवल्याने संवराची वृद्धी होते. ज्याप्रमाणे मजबूत बांधलेल्या घाटावर सरोवराचे पाणी येत नाही त्याचप्रमाणे संवराने युक्त झाल्यावर आत्म्यात कर्ममल प्रविष्ट होऊ शकत नाही. मोक्षमार्गासाठी संवर सहचर (मदतनीस) आहे. तो चतुर्गतीच्या तापाच्या भयापासून दूर ठेवणारा आहे.३२१
__ संवर भावनेसंबंधी उपाध्याय श्रीविनयविजयजींनी मुक्ती प्राप्त करण्याचे उपाय सांगितले आहेत. त्यात ज्ञान, दर्शन, चारित्र मूलक आराधनामय तीन उत्कृष्ट रत्नांना अवश्य शिव सुखाचे उत्तम उपाय सांगितले आहे. या उपायांचा स्वीकार करण्यासाठी विषय विकार व कषायरूपी शत्रूवर विजय मिळवून शीघ्र संयम गुणाची आराधना करण्याचा उपदेश दिला आहे. ते लिहितात- क्रोधरूपी अग्नी विझवण्यासाठी ढगासारखे उपशम भाव याचे सतत चिंतन करून, हृदयात जो परभाव भरलेला आहे तो दूर करून वैराग्य भावाचे चिंतन करा. आर्त आणि रौद्र ध्यानाचे मार्जन करा. मानसिक संकल्प-विकल्पाला जाळून टाका. जरा मानसिक संकल्प-विकल्पाचा मार्ग अवरुद्ध झाला तर तो तत्त्ववेत्ताला जो मार्ग मिळायला पाहिजे तो मिळू शकणार नाही. अंतरजागृती पूर्वक मानसिक शुद्धीने युक्त संयम योगद्वारा आपल्या देहाचे सार्थक करा. अर्थात आपल्या मनाच्या योगांना शुद्ध करा. संयत आचाराचे पालन करा. याने आपला मानव देह प्राप्त करणे सफल होईल. या संसारात विभिन्न मत-मतांतरांचे विषम जंगल पसरलेले आहे. जो भव अटवीत भटकवणारा आहे, त्यातून आपला शुद्ध मार्ग निश्चित करा. संयम व शालारूपी पुप्प-सौरभने तुम्ही आपल्या मनाच्या परिणामांना, अध्यवसायांना खूप सुरभित करा. ज्ञान, चारित्र्य गुणरूपी उत्तम लक्षण युक्त आत्मस्वरूपाचा अनुभव करा. जिनेश्वराच्या चारित्राचे सतत गुणगान करा. नामस्मरणाने आपली जिव्हा पवित्र करा. विनयपूर्वक शांत सुधारसाचे पान करा आणि दिर्घकालापर्यंत सुख प्राप्त करा, आनंद प्राप्त करा.२२२
- यात ग्रंथकाराने संवराबद्दल साधकाचे मन आकर्षित करून खालील विषयांचे प्रतिपादन केले आहे.
ज्ञान-दर्शन, चारित्र - या रत्नत्रयींची परम आराधना करणे. विषय - कषयांना दूर करणे. उपशम रसाचे अनुशीलन करणे.