________________
पाहिजे प्रवत्ती करताना प्रमाद होऊ नये, यासाठी धर्म आहे. अर्थात धर्माचरणाने असत् आचरण होत नाही.
धर्मात दृढता यावी त्यासाठी अनुप्रेक्षा आहेत. अत्यधिक भयानक वेदनांना सहन करणे परिषहजय आहे. रागादी दोषांपासून परावृत्त होऊन शुभध्यानात अनुरक्त आत्मस्वरूपाचा साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी योग्य पुरुषार्थ करणे चारित्र्य आहे. अशा प्रकारच्या आराधनेने आत्मा संवरोन्मुख होतो. म्हणून जो साधक विषयांपासून विरक्त राहतो त्याचा निश्चित संवर होतो. म्हणून मोक्षाभिलाषी साधकाने या भावनेचे सतत चिंतनमनन करावे.
आचार्य शुभचंद्र संवराचे विशेष महत्त्व सांगताना म्हणतात - ज्याप्रमाणे युद्धाच्या समरांगणात युद्ध करणारा चिलखताने शरीरावर कवच घालतो मग कोणताही बाण त्याला भेदू शकत नाही. त्याचप्रमाणे यमी म्हणजे अहिंसा इ. यमाने संवृत्त सुरक्षित योगी असंयममय बाणांनी विद्ध होत नाही. ३१६ माता संवराला कवचाची उपमा देऊन आचार्यांनी स्पष्ट केले की, संवर प्राप्त केल्यानंतर आस्रवाद्वारा येणारे कर्मप्रवाह त्यास आक्रान्त करू शकत नाही. ज्याप्रमाणे बाण शरीरात घुसला तर भयंकर वेदना होतात. कष्ट उत्पन्न होतात. अशाचप्रकारे आस्रवामुळे आत्मप्रदेशाबरोबर संश्लिष्ट होणारे कर्म आत्म्यात पीडा उत्पन्न करतात.
- एक चिंतक साधकाने आपल्या मनात अशाप्रकारचे भावचित्र निर्माण करावे की मी संवराचे कवच घातले आहे. आपल्यावर कषायरूपी शत्रूच्या बाणांचा वर्षाव होत आहे. परंतु एक ही बाण शरीरात घुसत नाही. अशा प्रकारच्या भावचिंतनाने खरोखर असे वाटू लागते की संवराचे कवच जरूर अंगीकार करावे जेणेकरून कर्मरूपी तीक्ष्ण बाण आत्म्यात प्रवेशच करू शकणार नाहीत.
। आचार्य हेमचंद्रांनी द्रव्य व भाव रूपात संवराचे दोन भेद केले आहेत. यांनी म्हटले आहे की, कर्म पुद्गलांना ग्रहण करण्याचा उपक्रम द्रव्य संवर आहे. आणि भवभ्रमणापासून मुक्ती मिळावी यासाठी केलेल्या क्रिया भावसंवर आहेत. त्यांनी असे म्हटल आहे की, ज्या-ज्या आसवांना. ज्या-ज्या उपायांनी परास्त करता येईल त्यासाठी विचकशाली साधकाने तो उपाय अवश्य अमलात आणावा. हिलाच संवर भावना म्हणतात.३१७
श्रीसोमदेवसूरी संवरभावनेचे विवेचन करताना लिहितात की, जीव नवीन येणाऱ्या