________________
(४७८)
परमार्थ स्वरूपात जितके लीन होऊ तितका संवर होईल. भरत चक्रवर्ती जेव्हा ड करीत होते तेव्हा पुंडरिक गणधरांनी भ. ऋषभ देवांना विचारले, भरत चक्रवर्तीचे यावेळी मनाचे परिणाम कसे आहेत ? भगवान म्हणाले तुझ्या सारखेच आहेत.
या युद्ध करीत असताना सुद्धा भरत महाराज अकर्ता भावनेने युद्ध करीत होते. त्यांचे मम सगळे ऋषभदेव भगवानांकडे लागलेले होते. युद्धात ते फक्त शरीराने होते मनाने नाही. जेव्हा ऋषभदेव भगवानांनी दीक्षा घेतली तेव्हा भरतचक्रवर्तीनासुद्धा दीक्षा घेण्याची भावना झाली होती. परंतु भ. अरषभदेवांनी त्यांना सांगितले की या युगलियावर जर योग्य राजा नसेल तर आपआपसात भांडतील. म्हणून तू राज्य कर. तुझ्या प्रारब्धातच राजा होण्याचे लिहिले आहे. आणि माझ्या नशीबात दीक्षाच आहे. अशाप्रकारे भरत महाराजांनी पिताच्या आज्ञेला स्वीकारून सहा खंडाचे राज्य सांभाळले. परंतु आश्चर्य हे की सहा खंडाचा महान राजा असूनही त्यांचे चित्त मात्र परमात्म्यात रममाण असायचे. हे काम तर चांगल्या चांगल्या मुनींना सुद्धा अशक्य होते ते त्यांनी अगदी सहजपणे असे भाव ठेवले. म्हणूनच संसारात राहून सुद्धा त्यांनी कर्म क्षय केले. ऋषभदेव भगवान दीक्षा घेतल्यानंतर हजार वर्षांपर्यंत छदमस्थ अवस्थेत विचरण करीत होते. आणि भरत चक्रवर्ती गृहस्थाश्रमात असून सुद्धा केवल ज्ञानी झाले. ३११
तात्पर्य हे की, मनुष्य बाह्यररूपाने कोणत्याही अवस्थेत असेना का, परंतु त्याचे आंतरिक (मनाचे) परिणाम जर शुद्ध असतील परमात्म भावात लीन असेल, कशातही राग (आसक्ती) नसेल तर जीव निश्चितपणे शुद्ध, दशेला प्राप्त करू शकतो.
। भगवती आराधनामध्ये आचार्य शिवार्यांनी मूलाचार प्रमाणेच संवर भावनेचे वर्णन केले आहे. परंतु त्यांनी प्रमादाच्या संवराचे ही वर्णन केले आहे. इंद्रिय संवरासाठी सुंदर उदाहरण दिले आहे. उदा. ज्याच्याजवळ विद्या, मंत्र, औषध नाही तो सर्पाला बश करू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्याचे मन चंचल आहे तो इंद्रियरूपी सर्पाला वश करू शकत नाही.
ज्याप्रमाणे लाकडाच्या छोट्याशा फळीने नावेत येणाऱ्या पाण्याला थांबवू शकतो, त्याचप्रमाणे अप्रमादरूपी फळीने अशुभ परिणामरूपी आस्रवद्वार रोकू शकतो.
याच गाथेच्या टीकेत लिहिले आहे की सत्य, स्वाध्याय, ध्यान, एकाग्रता हे विकथा नामक प्रमादाचे प्रतिपक्षी आहेत. क्षमा, मार्दव, आर्जव कषाय, प्रमादाचे विरोधी आहेत. ज्ञानाच्याद्वारे मनाला एकाग्र करून इंद्रियांच्या विषयात राग, द्वेषामुळे उत्पन्न होणारे