________________
च्या राशींना आपल्या सततत्त्वरूपी संवरने आणि ध्यान रूपी हाताने थांबवतात. म्हणजे
वाहाला थांबविण्याची प्रक्रिया करतात, तत्त्वज्ञान युक्त ध्यानाने आसवांना थोपबू शकतो. स्वतःला पुण्यवान सिद्ध करण्यासाठी पापनवाला थांबव. जो आत्म्याचे चिंतन करतो. ध्यान करतो, तो इंद्रियजन्य क्रोधाचा परित्याग करतोच जो मनाला विषय कपांनी संकुचित करतो, तो तू आहेस.
अशाप्रकारच्या चिंतनाने आत्मा संवराशी जोडला जातो. ज्याप्रमाणे जे जहाज विघ्नरहित असते. भयंकर वादळानेरहित असते ते समुद्र पार करू शकते. तसेच जीव आपआपल्या संचित कर्मांना दूर करतो. नष्ट करतो. आणि आरनवांना क्षीण करतो. नवीन कर्मास्रव रहित होतो. तो परमपद मोक्ष प्राप्त करतो.३१८
मा ज्याप्रमाणे नर्तकी नृत्याचे आयोजक नाट्याचार्यांच्या संचालकाप्रमाणे रंगभूमीवर नाना प्रकारच्या रस व भाव प्रदर्शित करते व नृत्य करते. परंतु जो विजिगीपुजीतचा इच्छुक विजयाची इच्छा ठेवणारे कामाच्यापुढे अर्थ पुरुषार्थाच्या प्राप्तीसाठी त्या नृत्य करणाऱ्या नटीला थांबवतात. त्यात विशिष्ट हिताहित विचार प्रकट होतो. त्याचप्रमाणे ज्ञानावरण इ. कर्माच्या विपाक वश होऊन आत्मारूपी रंगभूमीवर अनेक प्रकारचे रस व भाव व्यक्त करून चित्तशक्ती स्पंदन करते. मुख्य पुरुषार्थ मोक्ष अथवा धर्म प्राप्तीसाठी जे मुनी, त्यांना रोकतात, त्यांची अनिर्वचनीय उत्कृष्ट विवेक अर्थात शुद्धोपयोगामध्ये स्थिती प्रकट होते.३१९
शुद्धोपयोगात स्थित राहण्याने संवर होतो. कल्पनाविलासापासून दूर राहून जेव्हा मन आत्मस्वरूपात निश्चल होतो, तेव्हाच परम संवर होतो.
शुद्ध आत्मस्वरूपाचा घात करणारे मिथ्यात्व इ. शत्रूसैन्याची हिंमत वाढवतात त्यांना थांबवण्यासाठी विचारशील मुमुक्षु सम्यग्दर्शन इ. योद्धांना योग्य ठिकाणी नियुक्त करतात. ते नरक, तिर्यंच, कुमनुष्य, कुदेव, पर्यायात भ्रमण करायला लावणारी समस्त असातावेदनीय इ. पापकर्म प्रकृतीच्या बंधाला तर रोकतातच त्याबरोबर देवेंद्र, नरेंद्र इ. विभूतीची सम्पदा इच्छा नसताना सुद्धा त्या भाग्यशालींना मिळते.३२०
पंडित आशाधरांनी महाक्रोधीची लढाई महाधीराशी असे वर्णन केले आहे. आस्रवाच्या भेदांचा संवराच्या भेदांशी युद्ध असे चित्रण उपस्थित करून सत्चा विजय झाल्यावर जी सम्पदा प्राप्त होते त्याचे अत्यंत सुंदर शब्दात वर्णन केले आहे.
महाकवी रइध् यांनी 'पासणाहचरिउ' मध्ये संवरानुप्रेक्षाचे वर्णन करताना