________________
(४६३)
संसारापासून विरक्त राहणे. कोणत्याही प्रकारचा संकल्प-विकल्प न करणे.
मानसिक भ्रमांचा निरोध करणे.
निरंतर संयममय प्रवृत्तीत राहणे. शरीराचा सद्उपयोग करून त्याचा लाभ प्राप्त करून घेणे. विविध पंथातील जे जे सत्य मार्ग आहेत. त्यांचा स्वीकार करणे. संयम आणि आगमाच्या ज्ञानाने अध्यवसाय निर्मळ करणे. चैतन्याचे गुण व पर्याय ओळखणे. तीर्थकरांच्या चरित्राची स्तुती करावी, गुणगान करावे.
संवरभावनेत त्यागाला महत्त्वाचे, मुख्य स्थान आहे. ज्याला आपण आपले मानतो त्याचा त्याग कसा करावा ह्याचे वेगवेगळे मार्ग दाखवले आहेत.
आत्मविकास साधण्यासाठी संवरभावना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आपला कोणत्या कर्माशी संबंध आहे, त्यासाठी कोणता उपाय योग्य आहे हे प्रत्येक व्यक्तीने शोधले पाहिजे. परंतु त्या सर्वात त्यागभाव संसारापासून विरक्ती, उपशम भावाचा आदर, अकषायी वृत्ती, आस्रव मार्गावर विजय आणि शुद्ध देव, गुरू, धर्मावर श्रद्धा अथवा सम्यक्त्व असणे अती आवश्यक आहे.
सम्यक्त्व प्राप्तीशिवाय केलेली कोणतीही साधना, क्रिया म्हणजे एक अंकामागे लावलेल्या शून्यासारखी आहे. इलेक्ट्रिक लाईट किंवा सूर्याचा प्रकाश चहुकडे फैलावला असेल परंतु ते पाहण्यासाठी डोळेच जर नसतील तर काय फायदा ? भूमी व बीज दोन्ही उत्तम प्रकारचे आहेत. परंतु पाऊसच पडला नाही तर काय उपयोग ? अगदी याचप्रमाणे समकित दृष्टी जर नसेल तर तप, जप, क्रिया सगळे व्यर्थ. समकितदृष्टीशिवाय इच्छित मोक्षसुख प्राप्त होऊच शकत नाही. ज्याच्या आत्मारूपी जमिनीत समकित रूपी बी पेरलेले असेल तर त्यालाच संयम म्हणतात.३२३ प्रत्येक क्रियेत सम्यग्दृष्टी असेल तरच ती क्रिया फलदायक असू शकते. म्हणून मुनी रत्नचंद्रजींनी संवर भावनेच्या प्रथम गाथेमध्ये समकितचे महत्त्व सांगितले आहे की, आग्नवाचे प्रथम द्वार मिथ्यात्व आहे. त्याला बंद करण्याचा उपाय म्हणजे संवर होय. मुनी रत्नचंद्रजीच्या भावनाशतकानुसार संवराचा प्रथम भेद समकित आहे समकिताचे पाच भेद