________________
हे पाच प्रमाद फारच दुर्गतिदायक आहेत. श्री भगवतीसूत्राच्या आठव्या शतकात वर्णन आहे की चार ज्ञान ज्यांना प्राप्त झालेले आहेत जे चौदापूर्वधारी आहेत, आहारकलब्धी ज्यांना प्राप्त झालली आहे, असे मुनिराज जर या पाच प्रमादांच्या फेऱ्यात अडकले तर आयुष्य पूर्ण झाल्यानंतर अधोगतीलाच पोहोचतात. असे हे प्रमाद जे जीवन नष्ट करण्यास कारणीभूत आहेत. अशा दुष्ट प्रमादाच्या स्थितीला जाणूनच परमपिता प्रभू महावीरांनी स्पष्ट आदेश दिला आहे की एक समयमात्राचा प्रमाद करू नका. प्रमादपूर्णचर्या मनाची कलुषता, विषयांच्या प्रति लोलुपता. पर परिताप (परपीडा) आणि निंदा यांच्यामुळे पाप आनवांचे आगमन होते.२५८ कर्मबंध होण्याचे मूळ कारण प्रमाद आहे.२५९ म्हणून सतत अप्रमत भावनेने साधनेत प्रयत्नशील रहावे.२६० जीवनाचा धागा तूटला तर पुन्हा जोडला जात नाही. ते असंस्कृत आहे म्हणून प्रमाद करू नये.२६१
प्रमादी माणूस धनानेसुद्धा आपली रक्षा करू शकत नाही.२६२ साधकाने नेहमी भारण्ड पक्ष्याप्रमाणे अप्रमत्त राहून विचरण करायला पाहिजे. प्रबुद्ध साधक झोपलेल्यांच्यामध्ये सुद्धा नेहमी जागृत, अप्रमत्त असतात.२६३
श्रमण भगवान महावीरांनी ठिकठिकाणी साधकाला अप्रमत्त राहण्याचा संदेश दिला आहे. उत्तराध्ययन सूत्रात अनेक ठिकाणी सूत्र रूपात वर्णन आले आहे. त्याचबरोबर दहाव्या अध्यायात गणधर गौतमस्वामींना उद्देश्यून छत्तीसवेळा म्हटले आहे. "समयं गोयम् मा पभायए" कारण प्रमादच मृत्यूच्या मार्ग आहे. जो माणूस आळशी व प्रमादी आहे, त्याची प्रज्ञा (बुद्धी) ही वाढत नाही आणि त्याचे श्रुत (शास्त्रज्ञान) ही वाढत नाही.
मी जी व्यक्ती प्रमादी आहे, कोणत्याही प्रकाराने त्याच्या हातून प्राण्याची हत्या झाली तर निश्चित तो त्यांचा हिंसक ठरतो. परंतु जे प्राणी मेले नाहीत तरी ही प्रमादी त्यांचा ही हिंसक ठरतो. कारण त्याच्या अंत:करणात सर्वतोभावन हिंसक वृत्ती आहे. तो पापात्मा आहे. (ओधनियुक्ती गाथा ७५२-७५३)
जर माणसाने विचार केला की आज दिवसभर माझ्या हातून कोणकोणत्या चुका घडल्या, त्या चुकांना पुनश्च न करण्याचा प्रयत्न केला तर प्रमाद दूर होऊ शकतो.
- धर्म न करणे हे योग्य नाही आणि धर्म करून अभिमान करणे तर मुळीच योग्य नाहा. संसारात केल्या जाणाऱ्या कामातसुद्धा पात्रता लागते. स्त्रिया घरातील कामे करतात त्यात ही योग्यता लागते. एखादी स्त्री पोळ्या करते तेव्हा तळ्यावरती पोळी जळूही देत नाही अन कच्चीही ठेवत नाही. त्याप्रमाणे अप्रमत्त राहुन तप करणे चांगले आहे. तप
HISHE