________________
४) व्यवहार मनयोग व्यवहारिक मानसिक प्रवृत्ती सत्यही नाही, असत्य ही नाही, दोन्ही पासून रहित असे व्यवहार मनयोग आहे. उदा. आपण कोण्या गावाला जायला निघालो. गाव दिसू लागले तर आपण विचार करतो 'गाव आले' ही व्यवहारीकता आहे. तेल व दिवा तेवत असतो आणि म्हणतो दिवा जळत आहे. हे व्यावहारीक रूप झाले.
५) सत्य वचनयोग
सत्य बोलणे.
६ ) असत्य वचनयोग
७) मिश्र वचनयोग
मिश्र वचन बोलणे.
(४३८)
-
असत्य वचन बोलणे.
थोडे सत्य, थोडे असत्य. 'नरो वा कुंजरो वा' प्रमाणे
८) व्यवहार वचनयोग व्यावहारीक भाषा बोलणे. उदा. गाव आले, गाव येत नसते. परंतु व्यवहारात असे बोलले जाते.
९) औदारिक काययोग सात धातूंनी बनलेले असते त्यास औदारिक काय म्हणतात. असे शरीर मनुष्य, तिर्यंच गतीतील जीवांचे असते.
१०) औदारिक मिश्र काययोग औदारीक शरीराच्या उत्पत्तीच्या वेळी आणि उत्तर वैक्रियच्या वेळी जी मिश्र स्थिती होते ते औदारिक मिश्र काय योग होय. ११) वैक्रिय काययोग वैक्रिय शरीर देव व नारकीय जीवांचे असते. शुभाशुभ पुद्गलांनी निर्मित शरीर प्रवृत्ती.
(१२) वैक्रिय मिश्र काययोग वैक्रिय शरीर उत्पत्ती समय अथवा उत्तर वैक्रिय करतो त्यावेळची विशेष शारीरिक प्रवृत्ती.
-
१३) आहारक काययोग पूर्वधारी मुनींना जर कोणती शंका निर्माण झाली तर आत्मप्रदेशांच्या द्वारे केली जाणारी विशेष प्रक्रिया,
१४) आहारक मिश्र काययोग - आत्म प्रदेशासंबंधी प्रक्रियांना एकत्रित करून पुन्हा आत्मस्थ करतानाची विशेष शारीरिक प्रक्रिया.
१५) कार्मण काययोग आत्म प्रदेशाबरोबर संबंधित कर्म प्रदेशांची विशेष
स्थिती.
हे पंधरा प्रकारचे योग कर्माना आकर्षित करतात. २६५ आस्रव भावनांचे ८२ प्रकारांचे वर्णन दुसऱ्या कित्येक आचार्यांनी केले. त्यात पुष्कळशा प्रकारांचे वर्णन येते. परंतु आनवांच्या ४२ भेदांमध्ये ज्या २५ क्रियांचे वर्णन आले आहे, त्यांचे संक्षेपात