________________
आणखी मद सांगितला आहे आणि तो म्हणजे तप मद
३) आर्जव
आर्जव म्हणजे सरळता.
जो ऋजुभूत (सरळ) असतो त्याची शुद्धी लवकर होते. आणि जो मन, वचन, कायाने शुद्ध, असतो अशांच्याच हृदयात धर्म टिकून राहतो. जो धर्मात स्थिर असतो, तो तुपाने युक्त (तुपाने निर्मित) अग्निप्रमाणे परम निर्वाण पदाला प्राप्त होतो.
४) शौच अकलंकदेव यांनी शौच (पवित्र) याची व्याख्या करताना म्हटले आहे की, अत्यंतिक लोभ निवृत्तीला शौच म्हणतात. शौच शब्दाचा अर्थ शुचिभाव म्हणजे भावांची विशुद्धी. लोभ चार प्रकारचे १) स्व-व परविषयी जीवन लोभ, २) आरोग्य लोभ ३) इन्द्रिय लोभ ४) उपभोग लोभ या चारांपासून निवृत्त होणे शौच धर्म आहे. शीच म्हणजे पवित्रता.
-
-
(४५३)
800
५) सत्य - हित, मित आणि यथार्थ वचनांचा उपयोग करणे म्हणजे सत्यधर्म. ६) संयम
ईर्यासमिती इ. मध्ये प्रवृत्तिमान मुनींना त्यांच्या नियमांचे पालन करताना कोणत्याही प्राण्याला किंचितही पीडा होणार नाही आणि इंद्रियांचे संयम होईल अशा प्रकारचे चारित्र असणे म्हणजे संयम ऐकन्द्रिय इ. जीवांची हिंसा होऊ न देणे म्हणजे प्राणी संयम आणि शब्द इत्यादी विषयांची विरक्तीला इंद्रिय संयम म्हणतात.
-
मन, वचन, काया यात कुटिलता नसणे म्हणजे आर्जव आणि
७) तप - कर्म क्षय करण्यासाठी जे तप केले जाते ते तप आहे.
८) त्याग सचेतन किंवा अचेतन परिग्रहापासून निवृत्त होण्यास त्याग म्हणतात. परिग्रह सोडणे म्हणजेच त्याग संयमास योग्य असे ज्ञान इ. दान देणे म्हणजे सुद्धा त्याग.
९) अकिंचन्य - शरीर इत्यादित संस्कार व राग इ. च्या निवृत्तीसाठी "ममेम्म्" हे माझे आहे. किंवा कोणात्याही वस्तूत, पदार्थ, व्यक्तियांच्यात आसक्ती पासून परावृत्त होणे म्हणजे अकिंचन्य होय.
ब्रह्मचर्य - कलागुणांनी युक्त सुंदर स्त्रीला भोगले होते. अशाप्रकारे भूतकाळातल्या कामुक गोष्टींची आठवण करणे, स्त्रीकथा श्रवण करणे. वासना उद्वेलित करणारे सुगंधी द्रव पदार्थांचा उपयोग करणे, स्त्री संसक्त शय्या आसन स्थान या व अशाच ब्रह्मचर्य नष्ट करणाऱ्या गोष्टींपासून परावृत्त होणे म्हणजे ब्रह्मचर्य आहे. ब्रह्म म्हणजे गुरू. त्याच्या आधीन