________________
आपल्या वृत्ती ठेवणे ब्रह्मचर्य आहे. आपल्या पाच ही इंद्रियांवर संयम ठेवणे ब्रह्मचर्य होय. गुरुच्या आज्ञेप्रमाणे वागणे म्हणजे सुद्धा ब्रह्मचर्य आहे.३०२ बारा अनुप्रेक्षा
बाल प्रस्तुत विषय वारा भावना या अनुप्रेक्षाच आहेत. संवर भावनेत बारा भावनांचे चिंतन करावे असा उल्लेख आहे. म्हणून इथे बारा भावनांचे विवेचन आवश्यक नाही. बावीस परिसह जय
दुःख झाले तरी दुःखी व्हायचे नाही हे परिसहजय आहे.३०३ बाह्य व अभ्यन्तर द्रव्यांचे परिणमन रूप शारीरिक व मानसिक पीडा देणारी क्षुधा इ. जिंकणे, त्यावर संयम ठेवणे परिसहजय आहे.३०४
बावीस परिसहांचे विस्तृत वर्णन उत्तराध्ययन सूत्राच्या दुसऱ्या अध्ययनात दिले आहे. इथे फक्त बावीस परिसहांचा सामान्य अर्थ देत आहोत.
१) क्षुधा - भूक सहन करणे, भूक लागल्यावर धैर्य आणि शांतीने ती सहन करणे म्हणजे क्षुधा परिसहावर विजय.
२) तृषा - अतिशय तहान लागल्यावर सुद्धा व्याकुळ न होणे म्हणजे तृषा परिसहावर विजय.
३) शीत - भयंकर थंडीत सुद्धा प्रतिकार न करता शांतिने ती सहन करणे.
४) उष्ण - ग्रीष्मऋतू इ. कारणांमुळे उन्हाळ्याच्या दाहामुळे मनात चंचल उद्विग्न न होता शांततेने सहन करणे.
५) दंशमशक - डास, मच्छर, माश्या, पिसू इ. चावले तरी शांतीने सहन करावे.
liabita
i
fickinesistiansroesd
६) अचेल - वस्त्ररहित राहण्याची वेळ आली तरी लज्जा वाटून घेऊ नये. लहान बालकाप्रमाणे निर्विकार भाव ठेवून इंद्रियांचे विकार उत्पन्न न होऊ देणे हे अचेल परिषह जय आहे.
७) अरती - किती ही कष्ट सहन करावे लागले तरी संयम सोडू नये. तसे पाहिले तर सर्व परिसह अरती उत्पन्न करणारे असतात. तरीही धैर्य सोडू नये.
८) स्त्री - स्त्रियांचे हावभाव पाहून मन विचलित होऊ देऊ नये. ९) चर्या - गावोगावी विचरण करण्याचे कष्ट सहन करणे. भयंकर जंगलात
HE
SHEREncre