________________
तरी किंचित मात्रही न डळमळता अगदी स्थिर समभावात राहतात, यालाच कायगुप्ती म्हणतात. शारीरिक क्रियेत नियमितता ठेवणे, स्वच्छदतेचा त्याग करणे म्हणजे कायगुप्ती होय. २८९
समिती
अन्य प्राण्यांची रक्षा करण्याची भावना असणे अशा सम्यक प्रवृत्तीला समिती म्हणतात. २९०
(४५१)
कोणत्याही प्राण्याची पीडा दूर करण्यासाठी सम्यकप्रकारे क्रिया करणे म्हणजे समिती २९१
निश्चय नयाच्या दृष्टीने अनन्त ज्ञानादी स्वभावाचा धारक जो निज आत्मा आहे त्यात 'सम' अर्थात चांगल्याप्रकारे समस्त रोग इ. विभावांचा त्याग करून आत्म्यात लीन होणे, आत्मध्यानात रममाण होऊन जाणे म्हणजे समिती. २९२
गमन इ. क्रियेत आगमात जशी प्रवृत्ती सांगितली आहे त्याप्रमाणे प्रवृत्ती करणे समिती २९३
समिती पाच प्रकारची आहे. १. इर्ष्या २ भाषा, ३ एषणा ४. अदान निक्षेपना, ५. उच्चार २९४ या पाच समिती आहेत.
१) इर्यासमिती जीवस्थान आणि विधी जाणणारे धर्मात प्रयत्नशील साधू सूर्योदय झाल्यावर चक्षुरिन्द्रियाने दिसणारे आणि मनुष्य वगैरेंच्या आवागमनामुळे क्षुद्र जंतू ६. ने रहित मार्गात सावधान चित्ताने शरीराच्या अवयवांना संकोचून सावकाश चार हात जमीन पुढे पाहून गमन करणे इर्यासमिती होय.
-
यात जीवस्थान म्हणजे सूक्ष्म एकेन्द्रिय, बादर एकेन्द्रिय, द्विन्द्रिय, त्रिन्द्रिय, चतुरिन्द्रिय आणि सन्निपंचन्द्रिय व असन्निपंचेन्द्रिय यासातांचे पर्याप्त अपर्याप्त अशी चौदा जीवस्थाने आहेत.
(२) भाषा समिति स्व आणि पर यांना मोक्षाच्या मार्गावर नेणारे स्वपर हितकारक निरर्थक बटबट रहित, मितभाषी, स्पष्ट अर्थयुक्त असंदिग्ध वचन बोलणे म्हणजे भाषासमिती.
-
(३) एषणा समिति शरीररूपी गाडी त्यातील आत्मा गुणरत्नांची खाण या शरीराच्या माध्यमाने समाधीमार्गाकडे जाण्याची इच्छा असलेले साधू आपल्या जठराग्नीचा
-