________________
(४५०)
चांगले नाही. ज्याप्रमाणे सावली आणि उन्हात बसून मित्राची वाट बघणाऱ्यांमध्ये फरक आहे, त्याचप्रमाणे व्रत व अव्रताचे आचरण करणाऱ्या दोन्ही पुरुषात मोठे फरक आहे.
इथे आचार्याचा सांगण्याचा अभिप्राय हा आहे की ज्याप्रमाणे सावलीत बसून स्वतःच्या मित्राची वाट बघणारा यात्री सुखी होतो आणि उन्हात बसून वाट बघणारा दुसरा यात्री दुःखी होतो, त्याचप्रमाणे सम्यग् दृष्टी जीव जेव्हा निर्विकल्पभावात राहू शकत नाही तेव्हा त्याला व्रत इत्यादी पालन करण्याचे शुभ भाव उत्पन्न होतात, आणि त्या शुभ भावनेने तो स्वर्ग इत्यादीचे सुख भोगतो. मिथ्यादृष्टी जीव हिंसा अब्रत इ. च्या अशुभ भावाने नरकादी स्थानात दु:ख भोगवतो म्हणून नरकाच्या दुःखापेक्षा व्रत इत्यादीच्या आचरणाने स्वर्गाचे सुख चांगले. म्हणून जोपर्यंत निर्विकल्पदशा येत नाही तोपर्यंत व्रत इत्यादीची उपादेयता आहे.
संवर भावनेत व्रत प्रत्याख्यान आदिने आपल्या आत्माला पाप क्रियेतून संवृत करण्याचे चिंतन केले जाते. शेवटी लक्ष तर मोक्ष प्राप्तीचा असतो. परंतु जोपर्यंत आसवाचा निरोध रूप संवर दशेत जीव येत नाही तोपर्यंत पूर्ण निर्णय पण होऊ शकत नाही. आंतरीक स्वच्छतेसाठी प्रथम बाह्य कर्म येण्याचे थांबलेच पाहिजे. म्हणून संवर भावनेत समिती, गुप्ती, व्रत, इत्यादीचे चिंतन व चिंतनानु रूप आचरणाचे भाव व्यक्त केले आहे. संवराचे सत्तावन भेद
गुप्ती तत्त्वार्थवार्तिकात गुप्ती समिती इ. सत्तावन भेदांचा अर्थ स्पष्ट करताना म्हटले आहे की, ज्या कारणांमुळे आत्मा संसारात भ्रमण करतो त्या कारणाने आत्म्याचे गोपन अर्थात रक्षण करणे म्हणजे गुप्ति २८७
-
आचार्य उमास्वातींनी तत्त्वार्थ सूत्रात गुप्तीची व्याख्या अशाप्रकारे केली आहे की, तीन योगांचा योग्यप्रकारे निग्रह करणे म्हणजे गुप्ती २८८
गुप्ती तीन १) मन गुप्ती २ ) वचन गुप्ती ३) कायगुप्ती.
१) मन गुप्ती - सर्व प्रकारच्या कल्पना विलासापासून दूर, समभावात सतत स्थित आत्मस्वरूपाच्या चिंतनात मग्न असलेल्या मनाला ज्ञानी 'मनगुप्ती' म्हणतात. संकेत वगैरे न करता, मौन धारण करणे, अथवा वचन
२) वचन गुप्ती वृत्तीला वश करणे, काबूत ठेवणे म्हणजे वचनगुप्ती.
३) कायगुप्ती कायोत्सर्ग ध्यानात स्थिर असलेले मुनी कितीही उपसर्ग आले