________________
(४४८)
अनुभव करत अर्थात त्याच्यातच रममाण राहतो, तो जीव आत्मध्यानाने दर्शन, ज्ञानमय होऊन परद्रव्यमय बुद्धीला ओलांडून अगदी अल्पकाळात सर्व कर्मापासून मुक्त होती ही संवराची रीत आहे. २७९
"वारसाणुवेक्खा " मध्ये ६१ ते ६५ गाथांपर्यंत संवर अनुप्रेक्षाचे वर्णन केले आहे. त्यात सुंदर प्रकारे विवेचन केले आहे- संवर अवस्थेमध्ये चंचल मतिन, चल, मल, अगाढ दोषांने रहित सम्यक्त्वरूपी दृढ कपाटाद्वारे मिथ्यात्व रूपी आनव द्वारांचा निरोध होतो, असे जिनेंद्र भगवानांनी निर्देशित केले आहे.
मिथ्यात्व एक प्रवाह आहे. त्याद्वारे येणारे कर्म आत्म्यात संश्लिष्ट होतात. मग असा प्रवाह अनवरत चालू राहतो. त्या प्रवाहाला अडविण्याचे कार्य सम्यक्त्व रूपी दरवाजा करू शकतो. दार बंद करण्याने आस्रवाचे आत येणे थांबते. यालाच आस्रव निरोध म्हणतात. क्रमानुसार आनवाचा निरोध करण्याचे विश्लेषण करताना पुढे कुन्दकुन्दाचार्य म्हणतात - मनाने पाच महाव्रतांचे पालन करण्याने, अविरति ( हिंसादि पाच पाप रूप) मुळे येणारे कर्म निश्चितपणे थांबतातच. क्रोध इ. कपायरूप आसवाचे दार कपावरहित कपाटाने बंद होतात. जीव शुभ योगात प्रवृत्त होतो. आणि अशुभ योगामुळे येणारे कर्म अवरुद्ध होतात. आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करण्याच्या दिशेने वाटचाल करणारा जीव शुद्धोपयोगात प्रवृत्त होतो. जीव शुद्ध योगात प्रवृत्त झाल्यामुळे येणारे कर्म समूह आपोआप थांबतात.२८० प्रवचनसार या ग्रंथात याचे खूपच स्पष्ट रूपात विवेचन केलेले आहे. शुभ परिणाम पुण्य, अशुभ परिणाम पापाचे व शुद्धपरिणाम ज्ञानगत, ज्ञानाश्रित ज्ञायक रूप राग वर्जित असल्यामुळे मोक्षाचे कारण आहे. २८१
शुद्धोपयोगामुळे जीवात धर्मध्यान शुक्लध्यान यांचा प्रादुर्भाव होतो. अशाप्रकारे संवर ध्यानाचा हेतू आहे. याचा विशेष प्रकारे चिंतन, विमर्श करायला पाहिजे. २८२ आल्याचे निश्चय नयाच्या दृष्टीने विवेचन करताना आचार्य कुंदकुंद म्हणतात- शुद्ध निश्चयाने जीव संवर करू शकत नाही. कारण की, तो सदैव शुद्धभाव युक्तच आहे. आत्म्याच्या शुद्धभावात्मक दृष्टिकोनाने असे चिंतन करायला हवे की, आत्मा संवरात्मक विकल्प रहित आहे. कारण संवर कशाचे करायचे ? शुद्धभावात्मक आत्म्यात आसव होतच नाहीत तर निरोध कशाचा ? आस्रव प्रवाहरूप आहे. कर्म चैतन्य रहित आहेत. आणि जीव तर चैतन्यमय आहे. चैतन्य व अचैतन्याचा मेळ कसा होणार ? ही कुंदकुंदाचार्याची दृष्टी आहे.
Lasa
Prasad