________________
('४४७)
गुणस्थानाची वृद्धी होते.
गुणस्थान हा जैन धर्माचा पारिभाषिक शब्द आहे. आत्म्याच्या गुणांचा क्रमशः विकास जिथे होतो त्या स्थानाला जैनधर्मात 'गुणस्थान' म्हणतात. आणि आत्मगुणांचा विकास भावनेवर आधारित आहे. आत्मा ज्या-ज्या वेळी चांगल्या विचारांनी भावित असेल त्या-त्या वेळी त्यात सद्गुणांची वृद्धी होते आणि जितके मनात विचार वाईट येतील तसतसे दुर्गुणांचीच वृद्धी होत जाते. मनात चांगल्या वाईट विचारांची जी श्रृंखला चालते त्या विचारांच्या श्रृंखलेला स्थितीला गुणस्थान म्हणतात. या गुणस्थानामुळे आत्म्यामध्ये कोणता स्थायी भाव आहे हे समजते आणि आत्म्याची योग्यता काय आहे हे ही समजू शकते. असे गुणस्थान १४ आहेत. चौद गुणस्थान हे मोक्ष प्राप्तीच्या चौदा पायऱ्या आहेत.
आस्रव भावनेत मिथ्यात्व अविरती, प्रमाद, कषाय आणि योग यांना आम्रव म्हटले आहे. गुणस्थानात जसजसे वर चढत जातो तसतसे एकएक आस्रवाचा निरोध होऊन संबर होत जातो. उदा. चबध्या गुणस्थानात सम्यक्त्वाची प्राप्ती झाल्यावर मिथ्यात्व आसवाचा निरोध होऊन जातो. पाचव्या गुणस्थानात पाच अणुव्रत, तीन गुणव्रत आणि चार शिक्षाव्रत असे बारा व्रतरूप देश ( काही प्रमाणात) संयम होतो व अविरतिचा एक देश (काही अंशाने) अभाव होतो. सहाव्या गुणस्थानामध्ये अहिंसा इ. पाच महाव्रतांचा अंगिकार केला जातो म्हणून अविरति गुणस्थानाचा पूर्णपणे अभाव होतो.
सातवा गुणस्थान अप्रमादी गुणस्थान त्या अवस्थेत प्रमाद रहातच नाही.
अकराव्या गुणस्थानात २५ प्रकारच्या कषायांचा उदय होत नाही. आपोआप कषायांवर संवर होऊन जातो. आणि चवदाव्या गुणस्थानात योग (मन, वचन, काया) यांचा निरोध झाल्यामुळे योगाचा अभाव होतो. म्हणून मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय आणि योग यांच्या निरोधामुळे सम्यक्त्व, देशव्रत, महाव्रत, कषायावर जय व योगाभाव हे संवराचे कारण आहे. म्हणून त्यांना संवर म्हटले आहे. २७८
आचार्य कुंदकुंदांनी समयसार ग्रंथात संवर कशामुळे होतो हे सांगताना म्हटले आहे- जो जीव प्रथम राग, द्वेष मोह याने युक्त असतो, पण मन, वचन, काया यांच्या शुभाशुभ योगाने आपल्या आत्म्याला भेदज्ञानाच्या शक्तीने चंचल होऊ देत नाही, नंतर आत्म्याला शुद्ध दर्शन ज्ञानमय आत्मस्वरूपात स्थिर करून अन्य सर्व बाह्य अभ्यंतर परिग्रहाने रहित होऊन कर्म नोकर्मापासून वेगळे आपल्या स्वरूपात एकाग्र होऊन त्याचाच