________________
समयसार कलश यात म्हटले आहे- जीवाला जेव्हा भेद-ज्ञान प्राप्त होते. अर्थात जीव जेव्हा आत्मा आणि कर्म यांना यथार्थ रूपाने भिन्न समजतो तेव्हा तो शुद्ध आत्म्याचा अनुभव करतो. शुद्ध आत्म्याच्या अनुभवाने आस्रवभाव येण्याचे थांबतात. अनुक्रमाने सर्वत-हेने संवर होऊनच जातो. संवर होण्याच्या क्रमात सर्वात महत्त्वाचे कारण आहेभेद-विज्ञान. एकदा भेद-विज्ञान पक्के झाले की कर्मानव थांबलेच म्हणून समजावे. म्हणूनच या भावनेला अतिशय महत्त्वपूर्ण म्हटले आहे. व त्याचा उपदेश दिला आहे.
या भेद विज्ञानाला अखंडितपणे भावित करीत रहावे. जोपर्यंत परभावापासून अलिप्त होऊन आत्मा आपल्या ज्ञानमय स्वभावात पूर्णपणे स्थिरावत नाही तोपर्यंत या भावनेचा सतत अभ्यास करायला पाहिजे.
भेदज्ञान दृढ करण्याच्या अभ्यासाने शुद्ध तत्त्वाची उपलब्धि होते. शुद्ध तत्त्वाच्या उपलब्धिमुळे रागाचे समूह विलय पावतात व कर्माचे संवर होते. आणि कर्माच्या संवरामुळे ज्ञानातच स्थिर झालेले ज्ञान उदित होते. जे ज्ञान परम संतोष प्रदान करणारे आहे त्याचा प्रकाश निर्मल आहे. अर्थात रागादिमुळे जी मलीनता आलेली असते ती दूर होते. अम्लान होते. सर्व लोकालोकांचे स्पष्ट ज्ञान होते. एकमात्र शुद्ध ज्ञानमय आत्मा बनतो. आता क्षयोपक्षममुळे जे भेद होतात ते होत नाहीत. त्याचा प्रकाश अविनश्वर आहे.२८३
- संवराची व्याख्या प्रशमरति प्रकरणात अशा प्रकारे दिली आहे- मन, वचन, काया यांच्या व्यापाराने पुण्यकर्माचा आस्रव होत नाही व पाप कर्माचा ही आनव होत नाही. आत्म्यात चांगल्याप्रकारे धारण केले गेलेल्या व्यापाराला तीर्थकर भगवानांनी हितकारक संवर म्हटले आहे.२८४
संवर सर्वप्रकारे पूर्णतया कल्याणकारक आहे. म्हणून संवराची गुणवत्ता महत्ता जाणून घेऊन त्याचे चिंतन, मनन व आचरण केले पाहिजे. विचार करीत रहावे की, आस्रवाचे जे दोष आहेत ते संवरयुक्त जीवात कधीच येऊ शकत नाहीत. जो संबराच्या गुणवत्तेला समजतो, त्याचा विचार करतो, संवरात राहण्याचा सतत प्रयत्न करीत राहतो त्या जीवाची बुद्धी संवर, सिद्ध करण्यासाठी व अनुभवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहते.८५ संवराची सार्थकता सांगताना इष्टोपदेशमध्ये फार सुंदर वर्णन केले आहे
वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्वत नारकं । छायातपरथयोभेद: प्रतिपालयतोर्महान् ॥२८६
व्रत द्वार देव पद प्राप्त करणे चांगले पण अव्रत द्वारा नरक पद प्राप्त करण