________________
(४४६ )
वचन, काया या योगांमुळे आत्मप्रदेशात जी चंचलता निर्माण होते. त्यामुळेच कर्मांचे "निरुद्धास 'आगमन होते. ही चंचलता आसव आहे. संबराची व्याख्या अशी आहे संबरी २७४ आग्रवाला अडविणे म्हणजे संवर, तत्त्वार्थ सूत्रात म्हटले आहे आस्रव निरोधः संवरः २७५ अर्थात आनवाचा निरोध म्हणजे संवर
आस्रवाचा निरोध करणे म्हणजे आनेवाला प्रतिबंध घालणे. आपण अगोदर आसवाच्या ज्या भेद-प्रभेदांचे वर्णन केले आहे त्यांचा जितक्या जितक्या प्रमाणात निरोध होईल, तेवढ्या तेवढ्या प्रमाणात तो संवर झाला. आध्यात्मिक विकासाचा क्रम आव निरोधाच्या विकासावर आधारित आहे. जस जसा आस्रवाचा निरोध विकसित होईल तसतशी गुणस्थानाची पण वृद्धी होईल.
आस्रवभावनेत आत्म्याचे पतन कोणत्या कारणामुळे होते त्याचा विचार केला, आता संवर भावनेत आत्मउत्थान कोणत्या कारणामुळे होतो, येणाऱ्या कर्माचा कसा प्रतिबंध करायचा याचे मार्गदर्शन प्राप्त करूया.
-
संवर शब्द सम् + वृ या धातुने बनला आहे. 'सम' उपसर्ग आहे. 'वृ' धातू आहे. 'व' म्हणजे अडविणे, (धांबवणे) अवरुद्ध करणे, आसव प्रवाहाचे दार आहे त्याला बंद करणे संवर होय. ज्याने आपल्या आत्म्याला संयमित केले, वश केले आहे त्याला संवर प्राप्त झाले.
आसव हे कर्मरूपी पाण्याचा प्रवाहासारखा आहे. त्या प्रवाहाला अडवून कर्मरूपी पाणी आत येण्याचा रस्ता बंद करणे म्हणजे संवर. अर्थात कर्माच्या आगमनाचे दार बंद करणे म्हणजे संवर. २७६
संवर म्हणजे काय ? कर्माच्या आगमनाला थांबविण्यासाठी काय करायचे ? तर तीन गुप्ती, पाच समिती, दश धर्म, बारा भावना, बावीस परिसह आणि पाच प्रकारचे चारित्र्य यांच्या आचरणाने संवर होतो, २७७
संवर भावना व संवर तत्त्व यात कार्यकारण संबंध आहे. कारण वर उल्लेखलेल्या बारा भावनेत संवर कसे करावे याचे वर्णन केले आहे आणि संवर भावनाही पण बारा भावनांपैकी एक आहे. बारा भावनांचे विस्ताराने स्वतंत्रपणे ज्यांनी विवेचन केले आहे. त्यांच्या शिवाय ज्या कोणी महंतांनी भावनेचा विचार केला आहे त्यांनी संवर तत्याच्या अंतर्गतच बारा भावनांचे विवेचन केले आहे. म्हणून संवर भावना फार महत्त्वपूर्ण आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे जस जसे आनवाचा निरोध वाढत जाईल तस-तसे